पुतिन- ट्रम्प यांच्यात २ तास चर्चा ; ट्रम्प म्हणाले,”रशिया-युक्रेन युद्धबंदीसाठी लवकरच वाटाघाटी होणार “

Russia Ukraine War । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी युक्रेनमधील युद्धबंदीबाबत दोन तास फोनवर चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल ट्रुथवर पोस्ट करत पुतिन यांच्याशी त्यांची चर्चा खूप चांगली झाली. त्यांनी सांगितले की, “रशिया आणि युक्रेन युद्धबंदीसाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे युद्धाच्या समाप्तीसाठी तातडीने वाटाघाटी सुरू करतील. ट्रम्प पुढे बोलताना, “यासाठी कोणत्याही अटी असतील, त्या दोन्ही पक्षांमधील चर्चेतून ठरवल्या जातील.” असे म्हणाले.
रशिया मोठ्या प्रमाणात व्यापार करू इच्छितो Russia Ukraine War ।
या भयानक युद्धाच्या समाप्तीनंतर रशिया अमेरिकेसोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करू इच्छित असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ते म्हणाले, “रशियासाठी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणि संपत्ती निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्याचप्रमाणे युक्रेन आपल्या देशाच्या पुनर्बांधणी प्रक्रियेत अमेरिकेसोबत व्यवसाय करून याचा फायदा घेऊ शकतो.”
ट्रम्प म्हणाले की, “पुतिनशी बोलल्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की, युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीचे पंतप्रधान जिओर्डानो मेलोनी, जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ आणि फिनिशचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना याबद्दल माहिती दिली. ट्रम्प यांनी दावा केला की व्हॅटिकनने रशिया-युक्रेन चर्चा आयोजित करण्यात रस दाखवला आहे.
अण्वस्त्रांच्या वापराबाबत पुतिन काय म्हणाले? Russia Ukraine War ।
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी, अण्वस्त्रांचा वापर न करताही, युक्रेन मोहीम पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी रशियाकडे पुरेसे सैन्य आहे.”असे म्हटले. ते म्हणाले, “आम्हाला ही चूक (अण्वस्त्रे वापरण्याची) करण्यास भाग पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु या पर्यायाशिवायही आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे बळ आहे.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच “या संकटाची मूळ कारणे दूर करणे, दीर्घकालीन आणि चिरस्थायी शांततेसाठी परिस्थिती निर्माण करणे आणि रशियाला सुरक्षा प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे,” असे पुतिन म्हणाले. पुतिन यांच्या मते, “रशियाने वारंवार युक्रेन संघर्ष सोडवण्याचे आवाहन केले आहे आणि संकटाची मूळ कारणे शोधण्यावर भर दिला आहे.”





