पुतिन-ट्रम्प लष्करी तळावर भेटणार ; अमेरिकेने भेटीसंदर्भात काय म्हटले ? वाचा सविस्तर

Russia-Ukraine War। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या बातमीने जगात खळबळ उडाली आहे. या भेटीकडून लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत. भारतही अमेरिकेतील अलास्का याठिकाणी होणाऱ्या या आगामी बैठकीवर लक्ष ठेवून आहे. मोदी सरकारने अमेरिकेच्या अध्यक्षांनी अलिकडेच लादलेल्या ५० टक्के करवाढीला तोंड देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी बोलताना, “या शुक्रवारी अलास्कामध्ये रशियन नेते व्लादिमीर पुतिन यांना भेटण्याच्या योजनेवर ते वेगाने पुढे जात आहेत. ही एक अचानक ठरलेली शिखर परिषद असेल ज्यामध्ये ट्रम्प पुन्हा एकदा वाटाघाटीद्वारे युक्रेनमधील पुतिन यांचे युद्ध संपवण्याचे त्यांचे ध्येय गाठतील” असे त्यांनी म्हटले.
ट्रम्प आणि पुतिन कुठे भेटतील? Russia-Ukraine War।
एका इंग्रजी वृत्तसंस्थेनुसार, “दोन्ही देशांचे अध्यक्ष अँकोरेजमधील एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन अमेरिकन लष्करी तळावर भेटतील.”असे सांगण्यात आले आहे. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी, कदाचित पहिल्या दोन मिनिटांत मला कळेल की करार होऊ शकतो की नाही. जेव्हा एका पत्रकाराने विचारले की कसे, तेव्हा ट्रम्प यांनी उत्तर दिले की कारण मी तेच करतो. मी तडजोड करतो.” असे म्हटले होते.
रशिया-युक्रेन युद्धावर भारताला तोडगा निघण्याची आशा Russia-Ukraine War।
भारतात कर लादण्याची अंतिम मुदत जवळ येत आहे. मोदी सरकार रशिया-युक्रेन युद्धावर लवकर तोडगा निघेल अशी आशा करत आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल दंड आकारताना अमेरिकेने भारतावर अतिरिक्त कर लादले आहेत. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, युद्धादरम्यान भारताच्या तेल खरेदीमुळे रशिया आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे.





