Russia : रशिया भारतातून करणार कुशल १० लाख मनुष्यबळाची आयात

Russia – या वर्षाच्या अखेरपर्यंत रशिया बारतातून किमान १० लाख कुशल मनुष्यबळाची रशियामध्ये आयात करणार आहे. रशियातील औद्योगिक क्षेत्रामध्ये मजूरांची कमालीची कमतरता असल्यामुळे ही आयात केली जाणार आहे. रशियामध्ये आयात केल्या जाणारे हे कुशल मनुष्यबळ स्वेरडलोव्हस्क भागामध्ये आयात केले जाणार आहे.
याशिवाय येकातेरिंबर्ग येथे येथे नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्यात येणार आहे. तेथून या कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेविषयीचे सर्व व्यवहार पुर्ण केले जाणारआहेत, असे उरल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे प्रमुख आंद्रे बेसेदिन यांनी सांगितले.
भारतीयांचे कामगारांचे स्थलांतर स्वेरडलोव्हस्क प्रदेशात उच्च पात्र कामगारांची कमतरता भरून काढेल. स्वेरडलोव्हस्क आणि प्रांताची राजधानी येकातेरिनबर्गसह उरल पर्वतांमध्ये वसलेले आहे आणि येथे रशियन अवजड उद्योग आणि लष्करी-औद्योगिक संकुल आहे. तेथे जगप्रसिद्ध उरलमाश आणि टी-९० मालिकेतील रणगाड्यांची निर्माती करणाऱ्या उरल वॅगन झावोड उद्योग देखील आहे.
औद्योगिक उपक्रमांना उत्पादनाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. पण या प्रदेशाला कुशल कामगारांची कमतरता भासते आहे. युक्रेनमधील लष्करी कारवाईत काही कामगार तैनात आहेत आणि तरुण कारखान्यांमध्ये जात नाहीत, असे बेसेदिन म्हणाले.
श्रीलंका आणि उत्तर कोरियामधून कामगारांना रशियामध्ये आणण्याचा विचार रशिया करत आहे. परंतु तो एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. रशियाच्या कामगार मंत्रालयाने २०३० पर्यंत ३.१ दशलक्ष लोकांची कामगार कमतरता भासेल, असे भाकित केले आहे. २०२५ मध्ये पात्र परदेशी कामगारांना आमंत्रित करण्यासाठीचा कोटा १.५ पट वाढवून ०.२३ दशलक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.





