#RussiaUkraineWar : झेलेन्स्कींच्या युरोप भेटीनंतर रशियाचे युक्रेनवर जोरदार हल्ले; एका तासाच्या कालावधीत…

कीव – राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी काही युरोपीय देशांना भेट दिल्यानंतर रशियाने शुक्रवारी “मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले असल्याचे दिसून आले. त्यामध्ये सर्वाधिक लांब लांब पल्ल्याची शस्त्रे होती, असे युक्रेनने म्हटले आहे.
रशियाने शुक्रवारी सकाळी विविध शहरे आणि तेथील गंभीर पायाभूत सुविधांवर हल्ला केला. सात इराणी-निर्मित “कामिकाझे” ड्रोन अझोव्ह समुद्रातून आणि सहा कालिब्र क्रूझ क्षेपणास्त्रे काळ्या समुद्रातून सोडण्यात आली. त्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले. युक्रेनच्या हवाई दलाने पाच ड्रोन आणि पाच कालिबर क्षेपणास्त्रे पाडल्याचे सांगितले.
रशियाने पूर्वेकडील खार्किव प्रदेश आणि दक्षिणेकडील झापोरिझ्झ्या प्रदेशाला लक्ष्य करून 35 पर्यंत विमानविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांसह “मोठा” हल्ला केला. खार्किवमध्येही पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले. मात्र या आक्रमणात कोणीही जखमी झाले नाही परंतु शहरातील काही भगातील वीज गायब झाली आहे. झापोरिझ्झ्यामध्ये “ऊर्जा आणि औद्योगिक पायाभूत सुविधा” खराब झाल्यामुळे शहरातील काही भाग वीजविना राहिला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/uk-muslims-radicalisation-khalistan-movement-are-emerging-terror-threats-british-govt-report/
एका तासाच्या कालावधीत 17 स्ट्राइक नोंदवले गेले, जे रशियाने जवळजवळ एक वर्षापूर्वी आक्रमण केल्यानंतर “सर्वात मोठी संख्या” आहे. युक्रेनच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील भागातल्या अनेक उच्च व्होल्टेज सुविधा उध्वस्त झाल्या, ज्यामुळे काही भागात वीज खंडित झाली.





