Russia-Ukraine war : रशियाने आज युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा मारा केला. या हल्ल्यात किमान तिघे ठार झाले आणि डझनभर लोक जखमी झाले, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्रेनमधील निप्रोपेट्रोवस्क, मायकोताइव, चेर्निहिव, झापोरिझ्झिया, पोत्तावा, कीव, ओडेसा, सुमी आणि खारकीव या भागांमध्ये पायाभूत सुविधा, रहिवासी भाग आणि सार्वजनिक संस्थांवर रशियाने हा हल्ला केला होता, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. क्लस्टर युद्धसामुग्री असलेले क्षेपणास्त्र एका बहुमजली इमारतीवर पडल्याचेही त्यांनी सांगितले. रशियाने हा हल्ला जाणीवपूर्वक युक्रेनच्या नागरिकांना घाबवण्यासाठी आणियुक्रेनच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी केल्याचा आरोपही झेलेन्स्की यांनी केला. पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने आपण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बेटणार आहोत. त्यावेळी बालकांशी संबंधित मानवतावादी मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही झेलेन्सकी यांनी सांगितले. रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या मध्यवर्ती भागातील निप्रोपेट्रोवस्क भागातील किमान २० जण जखमी झाले असे स्थानिक गव्हर्नर सेर्हिल लयसाक यांनी सांगितले. निप्रो शहरातील काही उंच इमारतींचे या हल्ल्यात नुकसान झाले आहे. कीव शहरात ३ ठिकाणी झालेल्या माऱ्यामुळे घरे आणि कारचे नुकसान झाले. दोन क्रूझ क्षेपणास्त्रे पाडण्यात आली, असे लविव भागाचे गव्हर्नर मॅक्सिम कोझित्सक यांनी सांगितले. रशियाने ६१९ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे. ५७९ ड्रोन, आठ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ३२ क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याचे आढळून आले. युक्रेनच्या सैन्याने ५५२ ड्रोन, दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २९ क्रूझ क्षेपणास्त्रे पाडली आणि निष्क्रिय केली. इस्टोनियाच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप रशियाने आपल्या हवा हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोपइस्टोनियाने केला आहे. रशियाच्या तीन लढाऊ विमानांनी शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता आपल्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. ही विमाने १२ मिनिटे आपल्या हवाई हद्दीमध्ये राहिली होती, असे इस्टोनियाने म्हटले आहे. मात्र रशियाने हा आरोप फेटाळून लावला आहे. आठवड्यभरापुर्वीच नाटोच्या लढाऊ विमानांनी पोलंडच्या हवाई हद्दीतली रशियाची ड्रोन पाडली होती. यामुळे रशिया- युक्रेनमधील युद्धाची व्याप्ती आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली होती.