Russia in Mali । युक्रेनसोबतच्या २ वर्षांहून अधिक काळ युद्धात अडकलेल्या रशियाचा त्रास कमी होताना दिसत नाही. कारण आता उत्तर मालीमधील फुटीरतावादी बंडखोरांनी 131 रशियन सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे.” उत्तर मालीमधील फुटीरतावादी बंडखोरांनी 25 ते 27 जुलै दरम्यान अल्जेरियन सीमेजवळ झालेल्या लढाईत रशियन भाडोत्री गट वॅगनरचे 84 सैनिक आणि 47 सरकारी सैनिक मारले आहेत, असे वृत्त एका वृत्तसंस्थेच्या अहवालात म्हटले आहे. त्यांच्या नुकसानीची पुष्टी कोणीही करत नाही Russia in Mali । दुसरीकडे, मालीच्या बंडखोरांनी किंवा वॅगनरनेही चकमकीत त्यांचे किती सैनिक मारले गेले हे सांगितलेले नाही. त्यासोबतच 29 जुलै रोजी एका निवेदनात वॅग्नरने म्हटले की त्याचे मोठे नुकसान झाले आहे. माली अधिकाऱ्यांनीही आकडा जाहीर न करता लढाईत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. समर्थन सुरूच राहील – रशिया Russia in Mali । त्यासोबत रशियाने हे मोठे नुकसान असूनही माली जंटाला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे आणि चालू असलेल्या लष्करी आणि सामाजिक-आर्थिक सहकार्यावर भर दिला आहे.याठिकाणावरून मागे हटणार नसल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाचा पराभव करणारे हे बंडखोर कोण आहेत? दरम्यान, मढीमध्ये काही संघटनांनी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. तुआरेग बंडखोर गट आणि जमात नुसरत अल-इस्लाम वाल-मुस्लिमीन (जेएनआयएम) हे साहेल प्रदेशातील अल-कायदाशी संबंधित गट आहेत. सरकार वाचवण्यासाठी रशिया याठिकाणी घुसला होता, पण आता या दोन्ही संघटना रशियन सैनिकांवर मात करताना दिसत आहेत. दोन्ही संघटनांनी रशियन सैनिकांवर अनेकदा हल्ले केले असून त्याची जबाबदारीही घेतली आहे. या 131 जवानांचीही हत्या या दोन बंडखोर संघटनांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.