#RussiaUkraineWar : सोलेदार शहर जिंकल्याचा रशियाचा दावा; युक्रेनने मात्र …

किव्ह – युक्रेनमदील सोलेदार शहर जिंकल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र रशियाचा हा दावा खोटा असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. दोन्ही बाजूंकडून करण्यात येत असलेल्या दावे-प्रतिदाव्यांमध्ये सोलेदार हे “त्रिशंकू’ झाल्याची स्थिती आहे. रशियाने केलेल्या दाव्याप्रमाणे सोलेदार जर खरोकर रशियाने जिंकले असेल, तर गेल्या 11 महिन्यांच्या लढाईनंतर मिळालेले रशियासाठीचे मोठे यश म्हणायला लागेल.
युक्रेनच्या पूर्वेकडील या शहरावर ताबा मिळवल्यामुळे रशियाच्या सैन्याला आजूबाजूच्या बाखमत शहराला वेढा घालणे शक्य होणार आहे.
मात्र सोलेदार शहर जिंकल्याचा रशियाचा दावा खोटा असल्याचे युक्रेनच्या “इस्टर्न ग्रुप ऑफ फोर्सेस’च्या प्रवक्त्याने म्हटले आहे. या प्रवक्त्याने या संदर्बात कोणताही तपशील दिला नाही. युक्रेनच्या जनरल स्टाफकडून याबाबतची सविस्तर माहिती नंतर दिली जाईल, असे या प्रवक्त्याने सांगितले.
जनरल स्टाफनी आपल्या दैनंदिन निवेदनामध्ये रशियाकडून कोणत्या भागांवर बॉम्बवर्षाव केला, याची एक यादी प्रसिद्ध केली. यामध्ये अन्य काही भागांबरोबर सोलेदार शहराचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर रशियाच्या लष्करी कंत्राटदाराने रशियातील सोशल मीडियावर एक ऑडिओ पोस्ट करून सोलेदार शहरावर आपल्या सैन्याने ताबा मिळवल्याचा दावा केला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/national-news-air-india-draws-ire-after-passenger-finds-stone-in-meal/
शहराच्या मध्यवस्तीवर ताबा मिळवण्यासाठी या भागात अजूनही जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचेही या ऑडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे. या दाव्याबाबत आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी केलेल्या चौकशीला युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. या परिसरात रशियाच्या बॉम्बवर्षावामुळे सर्व काही बेचिराख झाल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी आपल्या दैनंदिन व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले होते.




