रूपगंध ; एचएमपीव्हीची भीती कशाला?

जगभरातील अनेक देशांमध्ये ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी अतिथंडीचा असतो आणि हाच विषाणूच्या प्रसाराला अतिशय पोषक असतो. साधरणतः डिसेंबर ते मार्च या काळात उत्तर ध्रुवीय देशांमध्ये अनेक प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित रुग्ण जास्त सापडतात. कारण तेव्हाचे वातावरण त्यांच्यासाठी पोषक असते. सध्या चीनसह भारतातही चर्चेत आलेला एचएमपीव्ही विषाणू हजारो वर्षांपासून निसर्गात आहे. जवळपास 90 टक्के लोकांना ते 20 ते 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत या विषाणूचे संक्रमण झालेले असते. 2020 मध्येच या विषाणूची महामारी आली होती; पण ती अतिशय सौम्य असल्याने तसेच लोकांचे संपूर्ण लक्ष कोव्हीड महामारीकडे असल्याने आपल्याला ते जाणवले नाही. कोव्हीडसाठीची रोगप्रतिकारकशक्ती जगभरतील कोट्यवधी लोकांच्यात तयार झाली असल्याने एचएमपीव्हीसाठी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस मानवी श्वसनक्षमतेवर सौम्य आणि गंभीर परिणाम करणार्या अनेक विषाणूंचा ज्याला रोगजनक (ज्यामुळे रोग होऊ शकतो) असेही म्हणतात, त्यांच्या नवीन प्रकारांचा शोध लागला. पूर्वीपासून ते निसर्गातच होते; पण मानवाला अनोळखी होते. 2020 मध्ये येऊन गेलेला कोरोना व्हायरस हा यापैकीच एक. सध्या त्यामध्येच आणखी एका विषाणूची भर पडतेय आणि तो म्हणजे एचएमपीव्ही. मानवी मेटापन्यूमो व्हायरस. या विषाणूचे जर मूळ शोधायचे असेल तर आपल्याला ऐंशीच्या दशकात जावे लागेल.
सन 1978 मध्ये दक्षिण आङ्ग्रिकेतील टर्कीमध्ये एव्हियन मेटापन्यूमोव्हायरस (याला पूर्वी टर्की व्हायरस म्हणून ओळखले जात असे) आढळून आले. तेव्हापासून, हा विषाणू जगभरात टर्की र्हिनोट्राचेटीस किंवा नासिकाशोथ विषाणू म्हणून ओळखला जातो. मुळात हा विषाणू कोंबडी आणि बदकांना संक्रमित करण्यासाठी ओळखला गेला आहे. या पक्षांमध्ये हा विषाणू अतिशय परिवर्तनशील, कमी मृत्यूदर पण जास्त संक्रमणशील आहे. या पक्ष्यांच्या नाकापासून ते ङ्गुङ्गुसाच्या वरच्या भागापर्यंत तो पसरतो आणि यामुळे त्यांचे पुनरुत्पादन कमी होते. म्हणजेच त्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते.
एव्हीयन मेटाप्युमोव्हायरसचे सध्या चार उपप्रकार आहेत आणि ते त्याच्या प्रथिनांच्या अनुवांशिक विविधतेवर आधारित आहेत. त्यामधीलच एक उपप्रकार म्हणजे एचएमपीव्ही मानवी मेटापन्यूमोव्हायरस. हा उपप्रकार 2001 मध्ये, नेदरलँडमधील संशोधकांनी प्रथम इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि आरटीपीसीआर तंत्राचा वापर करून श्वसन आजार असलेल्या 28 मुलांच्या नमुन्यांमधून वेगळा केला आणि त्यानंतर त्याची जगाला ओळख झाली. यामुळे ङ्गुफ्ङ्गुस आणि श्वसननलिकेमध्ये संक्रमण होते. विशेषत: लहान मुले, वृद्ध प्रौढ आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्तींमध्ये यांचे संक्रमण वेगाने होते.
एचएमपीव्ही हा एक आरएनए प्रकारातील विषाणू आहे. म्हणजेच याची अनुवंशिक सामग्री आरएनएच्या माध्यमातून साठवली जाते आणि त्याच्या अनुवंशिक सामग्रीचे संरक्षण त्याच्या पृष्ठभागावर असेलेली प्रथिने करतात. कोरोना व्हायरससुद्धा याच प्रकारात येत होता. त्याच्या पृष्ठभागावर असलेली प्रथिने त्याचे संरक्षण करत होती. या विषाणूत एक फ्यूजन (एङ्ग) प्रथिन आहे जे विषाणूला यजमान पेशींमध्ये म्हणजेच मानवी किंवा पक्षांच्या श्वसनमार्गातील पेशींमध्ये प्रवेश करायला मदत करतात.
एचएमपीव्हीचे संक्रमण श्वासोच्छवासाच्या थेंबांद्वारे पसरते. जी संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलत असते तेव्हा हा विषाणू बाहेर टाकला जातो. हा विषाणू अनेक वस्तूंच्या पृष्ठभागावरही जिवंत राहू शकतो, त्यामुळे दूषित वस्तूंना स्पर्श करणे आणि नंतर चेहर्याला (तोंड, नाक किंवा डोळे) स्पर्श केल्यास संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला मिठी मारणे किंवा हस्तांदोलन करणे यांसारख्या जवळच्या संपर्कामुळे देखील संक्रमणाचा धोका वाढतो. सामान्यतः 3 ते 6 दिवसांमध्ये याची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. यालाच उष्मायन कालावधी म्हणतात जो कोरोनासाठी सुरवातीला आठ दिवस मग चौदा दिवस आणि काही वेळेला पुन्हा चार दिवस झाला होता. याचा अर्थ एचएमपीव्ही विषाणूच्या किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर 6 दिवसांत लक्षणे दिसतात.
कोव्हीडसारखीच याचीसुद्धा लक्षणे असेउण त्यामध्ये वाहणारे नाक, खोकला, घसा खवखवणे, सौम्य ताप, थकवा, डोकेदुखी, घरघर, श्वास घेण्यास त्रास, श्वासोच्छ्वासाचा त्रास, न्यूमोनिया, ब्रॉन्कायलाइटिस (ङ्गुफ्ङ्गुसातील लहान वायुमार्गाची जळजळ) यांचा समावेश होतोय.
एचएमपीव्ही निदानाची अचूक मानक पद्धत न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिङ्गिकेशन (आरटी-पीसीआर) चाचणी ही आहे, तर याच जोडीला प्रतिजन शोध (अँटीजेन डिटेक्शन) व्हायरस कल्चर (प्रयोगशाळेत विषाणूचे प्रयोग) हेसुद्धा करता येते. एचएमपीव्हीसाठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार पद्धती नाही.
संक्रमित व्यक्तीचे व्यवस्थापन, सहाय्यक काळजीवर लक्ष केंद्रित करणे, ज्यामध्ये विश्रांती, गरम पाणी पिणे आणि ताप तसेच वेदनांसाठी वेदनाशामक औषधांचा समावेश आहे. दमट हवा श्वास घेण्यास मदत करू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये ऑक्सिजन थेरपी किंवा रुग्णालयात भरती होणे आवश्यक असू शकते. दुय्यम जिवाणूंचा बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्याशिवाय प्रतिजैविके म्हणजेच अँटिबायोटिक्स रुग्णाला देऊ नये हा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. त्यामुळे इथे एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की, एचएमपीव्हीसाठी अँटिबायोटिक्स उपयोगाची नाहीत.
एचएमपीव्हीला प्रतिबंध करण्यामध्ये व्हायरसचा संपर्क कमी करणे समाविष्ट आहे. मुख्य उपायांमध्ये साबण किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, संक्रमित व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे, खोकताना किंवा शिकतांना योग्य ती काळजी घेणे आणि सामान्यतः स्पर्श केलेल्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे समाविष्ट आहे. एचएमपीव्हीसाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही, ती विकसित करण्यासाठी संशोधन सुरु आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी अति थंडीचा असतो आणि हाच कालावधी विषाणूच्या प्रसाराला अतिशय योग्य असतो.
साधरणतः डिसेंबर ते मार्च या काळात उत्तर ध्रुवीय देशांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या विषाणूने संक्रमित रुग्ण जास्त सापडतात. कारण तेव्हाचे वातावरण त्यांच्यासाठी पोषक असते. हजारो वर्षांपासून एचएमपीव्ही विषाणू निसर्गात असल्याने साधारण 90 टक्के लोकांना ते 20 ते 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत या विषाणूचे संक्रमण झालेले असतेच. परंतु एचएमपीव्ही हा कोविड-19 सारखा नाही. जगभरातील सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे की, विषाणू सुमारे दोन दशकांपासून आपल्या आजूबाजूला पसरत आहे आणि जवळजवळ प्रत्येक मुलाला त्यांच्या पाचव्या वाढदिवसापर्यंत याचा संसर्ग होऊन गेलेला असतोय. खरं तर, उत्तर गोलार्धातील अनेक देश, ज्यामध्ये भारत आणि चीनचा समावेश आहे, परंतु त्यापुरता हा विषाणू मर्यादित नसून, दक्षिण गोलार्धातील आङ्ग्रिकी देश, ऑस्ट्रेलियामध्येही हा विषाणू आहे.
अमेरिका आणि ब्रिटनमधील आरोग्य अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येते की या देशांमध्येही गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून एचएमपीव्ही प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. या विषाणूची संपूर्ण जगातील सर्वच देशांमध्ये लाखो लोकांच्यात प्रतिकारशक्ती अस्तित्वात आहे, त्यामुळे कोव्हीड सारखी महामारीची परिस्थिती उद्भवण्याची कोणतीही शक्यता सद्यस्थितीत दिसत नाही. ऑक्सङ्गर्ड विद्यापीठातील संसर्ग आणि रोगप्रतिकारशक्ती या विषयावरील तज्ज्ञ प्रोङ्गेसर अँड्र्यू पोलार्ड यांच्या मते एचएमपीव्हीचा प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्धांवर परिणाम होतो. बहुतेक इतर वयोगटांमध्ये ते ङ्गक्त एक सामान्य सर्दीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे जरुरीचे आहे.
खरेतर सन 2020 मध्येच या विषाणूची महामारी आली होती; पण ती अतिशय सौम्य असल्याने तसेच लोकांचे संपूर्ण लक्ष कोव्हीड महामारीकडे असल्याने आपल्याला ते जाणवले नाही. कोव्हीड साथीच्या दरम्यान या रोगाने सूक्ष्मपणे व्यत्यय आणला होता. सन 2021 च्या उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील काळात दोन महामारीची शिखरे अनपेक्षितपणे नोंदवली गेली होती. पण याकडे जगाचे दुर्लक्ष झाले. सध्या, एचएमपीव्ही विषाणू मानवी किंवा इतर पशु पक्षांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला ङ्गसवून, किंवा रोगप्रतिकारक यंत्रणेतील सामग्रीची चोरी करून व्हायरल इन्ङ्गेक्शन वाढवतो आहे का ते अस्पष्ट आहे.कोव्हिडचा विषाणू जसे आपले मूळ स्वरूप बदलत होता शास्त्रीय भाषेत त्याच्यामध्ये म्युटेशन होत होते, तशीच काही म्युटेशन या विषाणूमध्ये सुद्धा होतील. पण ती नक्की कशी असतील हे अस्पष्ट आहे.
हा विषाणू साधारणतः 150 ते 600 नॅनोमीटर एवढा छोटा आहे तर त्याच्या बाह्यआवरणात असणारी प्रथिने हि 13 ते 17 नॅनोमीटर एवढी छोटी आहेत. या प्रथिनांच्या आकारात आणि गुणधर्मात जर बदल होताना दिसून आला तर आपण त्याची होणारी म्युटेशनस समजतील; पण हे खूप गुंतागुंतीचे विज्ञान असून त्यावरती संशोधन चालू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामीनाथन यांच्या मते आजच्या घडीला तरी एचएमपीव्ही विषाणूमध्ये म्युटेशन होताना दिसून येत नाहीत. आमच्याकडे असलेल्या माहितीवरून, कोणतेही नवीन उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्याचे दिसत नाही आणि हा विषाणू चीन आणि भारतातील समान विषाणू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत कोणतेही उत्परिवर्तन झाले नाही, काहीही नाही, चिंतेचे कारण नाही यावर जागतिक आरोग्य संघटना ठाम आहे. याची दुसरे बाजू अशीही आहे की जरी एचएमपीव्ही हा जुना विषाणू असला तरी, त्याच्यात कदाचित नवीन म्युटेशन झालेले असू शकते आणि त्यामुळेच आशियाई देशांतील संसर्गामध्ये अलीकडील वाढ दिसते. एचएमपीव्ही आणि कोव्हीड हे दोन्ही श्वासोच्छवासाच्या थेंबांद्वारे पसरणारे विषाणू आहेत. दोन्ही संक्रमणांचे होणारे परिणाम जवळजवळ समान आहेत. तसेच कोव्हीडसाठीची रोगप्रतिकारकशक्ती जगभरतील कोट्यवधी लोकांच्यात तयार झाली असल्याने एचएमपीव्हीसाठी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
– डॉ. नानासाहेब थोरात, ङ्गेलो ऑङ्ग रॉयल सोसायटी ऑङ्ग मेडिसिन, लंडन





