रूपगंध : सूर्याची रहस्ये उलगडणार

चांद्रयान मोहीम सुरु असतानाच इस्त्रोकडून आदित्य एल-1 ही सूर्याच्या अभ्यासासाठीची मोहीम सुरु करण्यात आली होती. सप्टेंबर 2023 मध्ये ‘आदित्य एल-1’चे यशस्वी प्रक्षेपण झाले आणि चार महिन्यांनी पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतर पार करत ते यान एल-1 पॉइंटवर पोचले. अलीकडेच सूर्याच्या अभ्यासाठी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून ‘ईएसए ‘प्रोबा-3 मिशनयान’ ‘पीएसएलव्ही-सी 95’च्या मदतीने यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आले. प्रोबा-3 मिशन हे एक युरोपीय अभियान आहे. युरोपीय अवकाश संस्थेने (ईएसए) ‘इस्रो’ची सक्षम उपग्रह प्रक्षेपण करण्याची क्षमता आणि कमी खर्चामुळे त्यानी भारताचे सहकार्य घेतले. या मोहिमांमुळे सूर्याबाबतची अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे. यामध्ये भारताच्या सौरमोहिमेकडे जगाचे विशेष लक्ष असणार आहे.
आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती असंख्य तार्यांपासून बनलेली आहे. वैज्ञानिक ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आपण सौरमालेत आहोत त्या सूर्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. सूर्यापासून जितकी ऊर्जा आणि तापमान निर्माण होतं त्याचा अभ्यास पृथ्वीवरुन केला जाऊ शकत नाही. त्यामुळं जगभरातील अंतराळ संशोधन संस्था सूर्याजवळ जितकं जाता येईल तितकं जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. सूर्यापासून मिळणार्या ऊर्जेतून पृथ्वीवर मनुष्यजीवन विकसित झाले आहे. विज्ञानाचा खोलवर अभ्यास केल्यास सूर्य हा प्रत्यक्षात एका डायनमोप्रमाणे काम करतो.
ज्याप्रमाणे डायनमोत यांत्रिक ऊर्जा ही विजेत रुपांरित होते, त्याप्रमाणे सूर्याच्या पृष्टभागावरील ऊर्जा दुसर्या रुपात स्थानांतरित होत असते. पण कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि जवळ येणार्या सर्व गोष्टींना वितळवून त्यांना भस्मसात करणार्या या अतुलनीय क्षमतेमुळे सूर्याची अनेक रहस्य आजही उलगडलेले नाहीत. नासा आणि यूरोपीयन अंतराळ संशोधन संस्था यांनी सूर्याचा अभ्यास करुन शोध लावले आहेत. आदित्य एल-1 च्या माध्यमातून इस्त्रोचा देखील सूर्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे.
सूर्याच्या अभ्यासासाठी पाच डिसेंबर 2024 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून ‘ईएसए ‘प्रोबा-3 मिशनयान’ ‘पीएसएलव्ही-सी 95’च्या मदतीने यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आले. प्रोबा-3 मिशन हे एक युरोपीय अभियान आहे. युरोपीय अवकाश संस्थेने (ईएसए) ‘इस्रो’ची सक्षम उपग्रह प्रक्षेपण करण्याची क्षमता आणि कमी खर्चामुळे त्यानी भारताचे सहकार्य घेतले.
‘पीएसएलव्ही सी-95’ ने अवकाशात सोडलेल्या प्रोबा-3 चा उद्देश सूर्याबाहेरील भागातून बाहेर पडणार्या लहरींचा अभ्यास करण्याचा आहे. सूर्याच्या अभ्यासात भारताला देखील स्वारस्य आहे. प्रत्यक्षात त्याची सुरुवात सप्टेंबर 2023 मध्ये पहिले सौर अभियान ‘आदित्य एल-1’ने झाली. यशस्वी प्रक्षेपणानंतर चार महिन्यांनी पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतर पार करत ते यान एल-1 पॉइंटवर पोचले. तेथे थांबून आकाशगंगेतील एकमेव तेजस्वी तारा सूर्याच्या अनेक बारीक गोष्टीचा अभ्यास करत आहे.
चांद्रयान मोहिमेप्रमाणेच आदित्य एल-1 मिशनने इस्रोला अनेक प्रकारची माहिती मिळणे अपेक्षित आहे. या यशाने अवकाश क्षेत्रात भारताचे स्थान अधिक मजबूत राहू शकते. एकार्थाने चंद्राबरोबरच सूर्याच्या अंगणातही ‘इस्रो’ने झेप घेतली असून भविष्याची नवी पायाभरणी केली आहे, असे म्हणावे लागेल. आदित्य एल-वन हे लँग्रेज पॉइंट (एल-1) नावाच्या एका विशिष्ट बिंदू किंवा स्थानावर आहे. तेथे सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती संतुलीत होते. या स्थानावर न्यूट्रल पॉइंट विकसित होऊ शकतो आणि तेथे अवकाश यानाला इंधनाची कमी गरज भासेल. ङ्ग्रान्सचे गणीतज्ज्ञ जोसेङ्ग लुईस लँग्रेज यांचे नाव त्या पॉइंटला देण्यात आले आहे. जोसेङ्ग लुईन लँग्रेज यांनी या बिंदूचा शोध 18 व्या शतकात लावला. हे ठिकाण पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर आहे आणि सूर्य आपल्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर. अशावेळी थोडे पुढ जात आदित्य एल-1 सूर्याबाबत बरीच माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
सौर वारे (सोलर विंड), सूर्यामुळे होणारे विद्युत चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) विचलन आणि सौर हालचालीमुळे पृथ्वीवरच्या हवामानावर म्हणजेच हवामान बदलावर हेाणार्या परिणामांचे योग्य आकलन करणे आणि मोजमाप करण्याची जबाबदारी आदित्य एल-1 वर असून ती आव्हानात्मक आहे. आदित्य एल वनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल ङ्गील्ड डिटेक्टरच्या मदतीने सूर्याच्या पृष्ठभागावर म्हणजेच ङ्गोटोस्ङ्गेयर आणि क्रोमोस्ङ्गेयरला जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच त्यांची पृथ्वीवरील ऊर्जा संचार तसेच अवकाशातील घडामोडीत काय भूमिका असते, हे देखील समजू शकेल.
सौर ज्वाला विखुरण्याचा जवळून अनुभवण्याचा प्रयत्न देखील आदित्य एल-वनच्या सात पेलोडच्या माध्यमातून केला जाईल. सूर्याबाबत अनेक रहस्य आहेत अणि त्यांना आदित्य एल-1 च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न होईल. कोरोनल मास इजेक्शन, सोलर फ्लेयर आणि त्याच्या वैशिष्ट्याबाबत जाणून घेण्यासाठी पुढील पाच वर्ष सक्रिय राहणार्या आदित्य एल-1 कडून सूर्याची इंत्यभूत माहिती मिळवण्याची ‘इस्रो’ला अपेक्षा आहे. या कामात ईएसएचे प्रोबा- तीन देखील महत्त्वाचा सहकारी म्हणून भूमिका बजावेल.
प्रोबा-3 ला देखील आधुनिक रुपातून सौरज्वालांचा सखोल अभ्यास करण्यासाठी तयार केले आहे. या अभियानुसार ईएसएने दोन उपग्रह कोरोनाग्राङ्ग आणि आक्यूल्टरला कृत्रिम रुपातून शेकडोवेळा पूर्ण सूर्यग्रहण करण्यासाठी पाठविले. यातून शास्त्रज्ञ सूर्याच्या बाहेरील वातावरण म्हणजेच कोरोनाचा रहस्यभेद करण्याचा प्रयत्न करतील. पूर्ण सूर्यग्रहणाच्या काळात सूर्याची चहूबाजूंनी दिसणारी तेजस्वी कडा हा वास्तविक कंकणाकृती म्हणजे कोरोना आहे आणि ते सामान्य अवस्थेत दिसत नाही.
आतापर्यंत नैसर्गिक रुपातून पाहण्याचा योगायोग हा खूपच कमी राहिला आहे आणि तो वर्षातून एकदाच होतो. पूर्ण सूर्यग्रहणाची अवस्था ही काही क्षणांची असते अणि तो एखाद्या हिर्याप्रमाणे चमकणारा कोरोनारुपी गुच्छ दिसतो. काही क्षणासाठी असणार्या या अवस्थेतून सखोल माहिती गोळा करणे कठीण आहे. तरीही ते काम करण्याचा प्रयत्न प्रोबा-3 च्या माध्यमातून केला जात आहे.
प्रत्यक्षात पृथ्वीपासून एका निश्चित कक्षात स्थापित केल्यानंतर प्रोबा-3 चे हे दोन्ही उपग्रह कोरोनाग्राङ्ग आणि आक्यूल्टर हे एकमेकांपासून दीडशे मीटर अंतरावरून उड्डाण घेत राहतील. याप्रमाणे हे दोन्ही उपग्रह येत्या दोन वर्षात शेकडो वेळा अशा स्थितीत असतील आणि यानुसार ते परस्परांपासून 492 ङ्गुटांच्या अंतरावर जातील, असेे नियोजन केले आहे. या हालचालीमुळे एका उपग्रहावर असलेली तबकडी दुसर्या उपग्रहावर असलेल्या टेलिस्कोपला आपल्या सावलीत घेईल. सावली पडल्यानंतर तेथे योग्यरित्या कृत्रिम सुर्यग्रहणाची स्थिती निर्माण होईल आणि त्यापैकी प्रत्येक सूर्यग्रहण हे सहा तासांचे असेल. अशा वेळी शास्त्रज्ञ आणि उपकरण हे व्यापक प्रमाणात माहिती गोळा करत कोरोनाची चांगल्या रितीने चाचपणी करण्यात यश मिळवू शकतात.
सूर्याच्या कोरोनात खगोलशास्त्रज्ञांची रुची असण्यामागे काही कारणे आहेत. अभ्यासानुसार नैसर्गिक ग्रहणाच्या काळात चंद्रामुळे सुर्याचा प्रकाश कमकुवत पडतो. सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा अनेक पटीने अधिक उष्ण असणारा कोरोना हा अधिक तापमान असतानाही कमी प्रकाश देतो आणि हे एक प्रकारचे गूढच आहे. ते उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय सूर्यावर होणार्या स्ङ्गोटातून बाहेर पडणार्या सौरज्वाला म्हणजेच कोरोनल मास इजेक्शनला (सीएमई) समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या स्ङ्गोटात म्हणजे ‘सीएमई’च्या काळात कोरोनातून असंख्य प्रमाणात प्लाझ्मा आणि चुंबकीय विखुरलेल्या लहरी सूर्याच्या पृष्टभागावरून बाहेर पडतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीवर होतो. प्रामुख्याने दळणवळण, माध्यम, दळणवळण उपग्रह आणि पॉवरग्रीड यंत्रणात या विखुरलेपणामुळे अडथळे येतेत. अशा वेळी कोरोना आणि त्यामुळे होणार्या स्ङ्गोटांच्या मालिकांचे रहस्य जाणून घेतले तर सौर ज्वालांपासून बचाव करण्याच्या प्रभावी मार्गाचा शोध घेतला जावू शकतो.
– प्रा. विजया पंडित





