मेष : आर्थिक आवक चांगली
व्यवसाय-नोकरीत अडथळ्यांवर मात कराल. कामात बदल करून काही ठोस पावले उचलाल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करून नवीन कामे ओढवून घेऊ नका. स्वतःची कुवत ओळखून पुढे जा. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी जादाची दगदग, धावपळ कमी करावी. रागावर नियंत्रण ठेवावे. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासास लागा.
वृषभ : वरकमाई करता येईल
कामाचे वेळी काम, इतर वेळी आराम, असे धोरण असेल. व्यवसायात नवीन जबाबदारी स्वीकाराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. अपेक्षित पैसे हाती येतील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. अपेक्षित पत्रव्यवहारांना गती येईल. महिलांचा प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
मिथुन :पूरक ग्रहमान
पूरक ग्रहमान लाभल्याने कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात कर्तव्यास प्राधान्य द्याल. स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल. कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्या वाढतील. परिणामी, दगदग, धावपळ वाढेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील, प्रवास घडेल. महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करता येईल.
कर्क : चांगली बातमी येईल
व्यवसाय-नोकरीत विस्ताराचे बेत सफल होतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील. अर्धवट कामे गती घेतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा सुख-सुविधा देतील. तरुणांचे विवाह पार पडतील. महिलांच्या कानावर चांगली बातमी येईल. परिणामी, त्यांचा उत्साह वाढेल.
सिंह : आकांक्षा सफल होतील
व्यवसायात आधुनिकीकरण करून कामात उलाढाल वाढवण्याचा तुमचा मानस असेल. त्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासेल. बॅंका व हितचिंतकांची मदत घेऊन कामांना गती आणाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत तुमच्या मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा सफल होतील. सहकारी व वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.
कन्या : अपेक्षित यश मिळेल
उत्साहवर्धक वातावरण लाभेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कामातील प्रगतीचा आलेख वाढता राहील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत अतिमहत्त्वाकांक्षेच्या आहारी जाऊ नका. कामात बिनचूक राहून काम वेळेत उरका. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल.
तुळ : आर्थिक स्थिती उत्तम राहील
व्यवसाय वृद्धिंगत करण्याकडे कल राहील. दिवसाचे 24 तासही कमी पडतील. कामात भरपूर यश मिळेल. प्रगतीचा वेग तसेच आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरीत हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा चंग बांधाल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. परदेशगमन व परदेशव्यवहाराच्या कामांना गती मिळेल.
वृश्चिक : मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील
तुमचा उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात तुमच्या उद्योगप्रिय स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. परिणामी, तुमची निराशा कमी होईल. येणी वसूल झाल्याने तुमच्या इच्छा-आकांक्षांना चालना मिळेल. पैशांची ऊब मानसिक स्वास्थ्य उत्तम राखेल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील.
धनु : मनातील बेत साकार होतील.
तुमच्या स्वच्छंदी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नका. ऐकीव गोष्टींवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष पडताळा करून मगच निर्णय घ्या. आर्थिक व्यवहारात चोखंदळ रहा. नोकरीत सहकाऱ्यांकडून कामे करून घेणे जिकरीचे असेल. कामाचा वेग वाढवण्यासाठी बरीच धावपळ, दगदग होईल.
मकर : फायदा होईल
व्यवसाय-नोकरीत व्यवहारी धोरणाचा अवलंब करून फायदा मिळवाल. योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड कराल. वसुली करताना व आर्थिक व्यवहारात गिऱ्हाईकांच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही, याची विशेष काळजी घ्याल. नोकरीत वरिष्ठ कामे पूर्ण करण्यासाठी तगादा लावतील, तरी न चिडता कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महिलांचा अनावश्यक खर्च होईल.
कुंभ : प्रगती कराल
सध्या राघोभरारी व उत्तेजन देणारे दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःचे विचार सौम्य पण प्रभावीपणे मांडून व्यवसायात बरीच प्रगती कराल. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून यश मिळवाल. तुमच्यातील साहस वृत्ती जागी होईल. स्पर्धेत टिकून राहण्याची युक्ती शोधाल. नोकरीत कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. प्रकृतीची साथही उत्तम लाभेल.
मीन : कल्पकता दाखवण्याची संधी
तुमच्यातील रसिक व कल्पकतेला दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात लवचिक धोरण ठेवून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आर्थिक स्थिती नाजूक राहील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळवण्याकडे कल राहील. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कामाचा उरक पाडावा.