मेष : अतिविश्वास टाळा
पैशांचे सोंग पांघरता येत नाही, हे लक्षात ठेवून खर्च करा. मनावर संयम ठेवा. पैशांची चणचण जाणवेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन लाभदायी ठरेल. केलेल्या कष्टाच्या मानाने यश मिळेल. नोकरीत स्वतःचे काम स्वतः करा. अतिविश्वास टाळा. उधार-उसनवार शक्यतो टाळा. घरातील व्यक्तींचा नवीन अनुभव येईल. कामाचे वेळी सर्व जण हात वर करतील
वृषभ : सुवार्ता कळेल
अंधविश्वास ठेवून कोणतीही कृती करू नका. व्यवसायात कामातील अडचणी कमी होतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत वरिष्ठ जादा कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. त्यासाठी तुमची थोडी खुशामतही करतील. नातेवाईकांची भेट-गाठ पडेल. मुलांकडून सुवार्ता कळेल. खेळाडूंना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
मिथुन : संधीचा फायदा घ्या
मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलंत तर जीवनात आनंद मिळेल. कामात कार्यतत्पर राहा. व्यवसायात हातातील कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. नवीन व्यक्तींवर जादाचा विश्वास ठेवू नका. प्रयोगापेक्षा कृतीवर भर द्या. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत मनाला जे पटेल तसेच वागा. कुटुंबासमवेत वेळ मजेत जाईल.
कर्क : पैशांची चिंता मिटेल
कार्यमग्न राहून प्रगती करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. पैशांची चिंता मिटेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतीलच, हे गृहीत धरू नका. चिडचिड न करता कामाची आखणी योग्यप्रकारे करा. तुमच्या कामात कसूर होऊ देऊ नका. तरुणांनी अतिधाडस करू नये.
सिंह : प्रगती कराल
“जो दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ ही म्हण आठवेल. तरी कामात हलगर्जीपणा न करता स्वतःची कामे स्वतः करा. व्यवसायात पैशांचे ठोकताळे चुकल्याने कामांना विलंब होईल. काही बेत पुढे ढकलावे लागतील. धंद्यात योग्य वेळी योग्य कृती करून प्रगती साधा. घरात मोठ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कामात मन रमवून वेळ घालवाल.
कन्या : वरकमाई करता येईल
“स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात प्रयत्न केल्याशिवाय यश नाही, हे लक्षात येईल. कामातील प्रगती समाधानकारक राहील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. कामानिमित्ताने परदेशगमन व लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात खरेदीचे मनसुबे आखाल.
तुळ : वादविवाद मिटतील
सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने आश्चर्यचकित व्हाल व कोणाशी कसे वागायचे, बोलायचे यांबाबत गोंधळून जाल. व्यवसायात बुद्धीला जे पटेल, तेच निर्णय घ्या. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. व्यवहारात दक्ष राहून घेतलेले निर्णय पुढे उपयोगी पडतील. घरातील वादविवाद मिटतील.
वृश्चिक : नवीन कामे मिळतील
स्वकर्तृत्वावर कामाचा उरक पाडाल. व्यवसायात मनाप्रमाणे उलाढाल राहील. कमी श्रमात जास्त पैसे मिळाल्याने आनंदी व्हाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. सहकाऱ्यांकडून खुबीने इतर कामे करून घ्याल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्ताने अभ्यास करावा.
धनु : आर्थिक घडी सुधारेल
माणसांची पारख छोट्या छोट्या गोष्टींतून झाल्याने भ्रमनिरास होईल. व्यवसायात वेळप्रसंगी जो उपयोगी पडेल, तो देवासमान असेल. वसुली झाल्याने आर्थिक घडी सुधारेल. मनाप्रमाणे कामे पार पडतील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. कार्यपद्धतीत बदल करून बाजी माराल व कौतुकास पात्र व्हाल. घरात विचार व कृती यांचा समन्वय साधून कामे करा.
मकर : ग्रहांची साथ
व्यवसायात महिनाभरात बरीच प्रगती साधू शकाल. ग्रहांची साथ आहे. कामात सामंजस्य दाखवून कामांना गती द्याल. पैशांची चिंता नसेल. सरकारी कामात यश येईल. नोकरीत तुमचे व कामाचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांकडून अधिकारात वाढ होईल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. घरात महिलांना स्वातंत्र्य लाभल्याने समाधान मिळेल. अनावश्यक खर्च टाळण्याचा विशेष प्रयत्न राहील. तरुणांना मनाप्रमाणे पद भूषविता येईल.
कुंभ : इच्छा साकार होणार
तुमच्या मनातील इच्छा प्रत्यक्षात साकार करण्याची संधी येईल. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून काही ठोस पावले उचलाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन योजना आखाल. खेळत्या भांडवलाची केलेली तरतूद लाभदायी ठरेल. नोकरीत हितशत्रूंपासून सावध रहा. घरात जुन्या प्रश्नांवर व वादांवर तोडगा निघेल. महिलांना दिलासा देणारी घटना घडेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
मीन : सबुरीचे धोरण ठेवा
थोडेसे संभ्रमात टाकणारे ग्रहमान आहे. तरी मनाला योग्य वाटेल तसेच वागा व निर्णय घ्या. व्यवसायात योग्य मार्ग मिळण्यासाठी थोडे सबुरीचे धोरण ठेवा. नवीन कामांमुळे जुने हितसंबंध संपण्याची शक्यता आहे, तरी शांत रहा. पैशांची आवक चांगली असेल. नोकरीत हातातील कामात बिनचूक राहा. गडबड-गोंधळ टाळा, झेपेल तेवढेच काम करा. पेल्यातील वादळे उठतील व पेल्यातच विरतील. डोके शांत ठेवा.