Rupee Vs Dollar : रूपयाच्या मूल्यात 15 पैशांनी घसरण…
Updated On:

मुंबई – डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडाविरोधात मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या बेफाम धमकीमुळे डॉलर बळकट होत असून जागतिक वित्तीय क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम रुपयासह जगातील इतर चलनावर होत आहे.
बुधवारी रुपयाचे मूल्य 15 पैशांनी घसरून 84 रुपये 44 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेले. दरम्यानच्या काळात खनिज तेलाच्या किमती वाढत असल्यामुळेही रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे.
समाधानाची बाब म्हणजे आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. त्यामुळे रुपयाच्या मूल्यात होणारी जास्त हानी टळली असे विश्लेषकांनी नमूद केले.


