Rupali Chakankar : चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या, पाहा…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे.

Updated On:
Rupali Chakankar : चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय म्हणाल्या, पाहा…

Ashok Kharat | Rupali Chakankar – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. अशी माहीती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे.

स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांवरून विरोधी पक्षांकडून टीकेचा सामना करावा लागल्यानंतर, चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

चाकणकरांनी शुक्रवारी आपले राजीनामा पत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केले. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीच त्यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहीती आहे. Rupali Chakankar

सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या तपासाचा विचार करून चाकणकर यांनी आपला राजीनामा दिला आहे. हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडावा हे सुनिश्चित करण्यासाठी मी त्यांचा राजीनामा पुढील प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे, असे पवार म्हणाल्या.

rupali chakankar

rupali chakankar

‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरण : Rupali Chakankar

नाशिकमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले अशोक खरात प्रकरण दररोज नव्या खुलाशांमुळे अधिक गंभीर होत चालले आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातवर महिलांवरील अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक गैरप्रकारांचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

अशोक खरात नाशिकमध्ये प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स नावाचे कार्यालय चालवत होता. याच कार्यालयात अनेक महिलांना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश मात्र त्याच्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्यामुळे झाला. कार्यालयातील ऑफिस बॉयने सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतल्याने खरातच्या कथित कृत्यांचे पुरावे बाहेर आले, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat : अशोक खरातचे ते 56 व्हिडिओ कुणी बाहेर काढले? ‘कॅप्टन’ला जाळ्यात अडकवणारा खरा ‘मास्टर माईंड’ कोण? वाचा…

तपासादरम्यान महिलांशी संबंधित ५६ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली. या क्लिप्सच्या आधारे खरातला ब्लॅकमेल करून मोठी खंडणी मागितल्याचाही आरोप आहे.

खंडणी न मिळाल्यानंतर काही संशयितांनी पीडित महिलांनाच फोटो व व्हिडिओ पाठवून धमकावल्याचेही उघड झाले. यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतल्याने प्रकरण अधिकृतपणे समोर आले.

एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाची दिशा बदलली. या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय व प्रभावशाली व्यक्तींशी जोडले जात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने तातडीने एसआयटी स्थापन केली. या पथकाकडून आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

सध्या अशोक खरात अटकेत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अत्याचार, खंडणी, राजकीय प्रभाव आणि प्रशासनातील निर्णयप्रक्रिया या सर्व गोष्टींमुळे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा भूकंप ! 12 नगरसेवक बंड करणार? थेट पत्रकार परिषद घेत...

2026-07-10 15:46:09

Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा भूकंप ! 12 नगरसेवक बंड करणार? थेट पत्रकार परिषद घेत...

Crime News : पाइपलाइनचा वाद, थेट जीवे मारण्याची धमकी; चौघांविरोधात गुन्हा दाखल

2026-07-10 11:01:10

Crime News : पाइपलाइनचा वाद, थेट जीवे मारण्याची धमकी; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Crime News : शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

2026-07-10 10:52:18

Crime News : शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Koregaon Bhima : सतर्क पोलिसांमुळे आई-मुलावरचा जीवघेना हल्ला टळला; अवघ्या काही मिनिटात आरोपी जेरबंद !

2026-07-07 21:42:45

Koregaon Bhima : सतर्क पोलिसांमुळे आई-मुलावरचा जीवघेना हल्ला टळला; अवघ्या काही मिनिटात आरोपी जेरबंद !

Ashadhi Wari 2026 : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती

2026-07-07 16:59:46

Ashadhi Wari 2026 : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती