Ashok Kharat : अशोक खरातचा आणखी कांड उघड; मराठवाड्याच्या हक्काचे ३९ लाख लिटर पाणी पळवले

अशोक खरात नाशिकमध्ये प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स नावाचे कार्यालय चालवत होता. याच कार्यालयात अनेक महिलांना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Updated On:
Ashok Kharat : अशोक खरातचा आणखी कांड उघड; मराठवाड्याच्या हक्काचे ३९ लाख लिटर पाणी पळवले

Ashok Kharat : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यासाठी राखीव असलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात यांच्या संस्थेला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिरगाव (ता. सिन्नर) येथील शिवनिका संस्थानला दररोज तब्बल ३९ लाख लिटर पाणी पुरवण्याचा निर्णय ३१ जुलै २०२० रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने मंजूर केला होता आणि त्याच दिवशी शासन आदेशही जारी करण्यात आला. Ashok Kharat

संस्थानासाठी बाग-बगिच्यांची उभारणी करण्यासाठी पाण्याची गरज असल्याने खरातने दारणा धरणातून थेट संस्थानापर्यंत सुमारे ४८ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव दिला होता.

Ashok Kharat

Ashok Kharat

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या शिफारशीवरून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या निर्णयामागे राजकीय प्रभाव वापरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अभ्यासकांच्या मते दरडोई ५५ लिटर पाण्याचा निकष धरल्यास या ३९ लाख लिटर पाण्यातून सुमारे ७१–७२ हजार नागरिकांची रोजची तहान भागू शकली असती. त्यामुळे दुष्काळी भागासाठी असलेले पाणी खासगी संस्थेला देण्याच्या निर्णयावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. Ashok Kharat

‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरण : Ashok Kharat

नाशिकमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले अशोक खरात प्रकरण दररोज नव्या खुलाशांमुळे अधिक गंभीर होत चालले आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातवर महिलांवरील अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक गैरप्रकारांचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

अशोक खरात नाशिकमध्ये प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स नावाचे कार्यालय चालवत होता. याच कार्यालयात अनेक महिलांना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश मात्र त्याच्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्यामुळे झाला. कार्यालयातील ऑफिस बॉयने सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतल्याने खरातच्या कथित कृत्यांचे पुरावे बाहेर आले, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

तपासादरम्यान महिलांशी संबंधित ५६ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली. या क्लिप्सच्या आधारे खरातला ब्लॅकमेल करून मोठी खंडणी मागितल्याचाही आरोप आहे.

खंडणी न मिळाल्यानंतर काही संशयितांनी पीडित महिलांनाच फोटो व व्हिडिओ पाठवून धमकावल्याचेही उघड झाले. यानंतर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतल्याने प्रकरण अधिकृतपणे समोर आले.

एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाची दिशा बदलली. या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय व प्रभावशाली व्यक्तींशी जोडले जात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने तातडीने एसआयटी स्थापन केली. या पथकाकडून आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

सध्या अशोक खरात अटकेत असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अत्याचार, खंडणी, राजकीय प्रभाव आणि प्रशासनातील निर्णयप्रक्रिया या सर्व गोष्टींमुळे हे प्रकरण केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Crime News : शिरुरच्या लॉजिंगमध्ये तरुणीवर अत्याचार; ७ जणांचा सहभाग, एकाला अटक

2026-08-23 08:09:38

Crime News : शिरुरच्या लॉजिंगमध्ये तरुणीवर अत्याचार;  ७ जणांचा सहभाग, एकाला अटक

Crime News :पतीच्या मारहाणीत जखमी महिलेचा मृत्यू; एक महिन्यानंतर मृत्यूशी झुंज अपयशी

2026-08-23 07:41:51

Crime News :पतीच्या मारहाणीत जखमी महिलेचा मृत्यू; एक महिन्यानंतर मृत्यूशी झुंज अपयशी

Ahilyanagar News : अहिल्यानगरात 'साम टीव्ही'च्या प्रतिनिधीवर प्राणघातक हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईसाठी श्रीरामपूर पत्रकार आक्रमक

2026-08-22 15:25:11

Ahilyanagar News : अहिल्यानगरात 'साम टीव्ही'च्या प्रतिनिधीवर प्राणघातक हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईसाठी श्रीरामपूर पत्रकार आक्रमक

Pune Crime : ARAI टेकडीवरील 17 वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

2026-08-21 19:43:05

Pune Crime : ARAI टेकडीवरील 17 वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

Crime News : शिरूर तालुक्यातील शेळी चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद

2026-08-21 07:38:09

Crime News : शिरूर तालुक्यातील शेळी चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद