मोठी बातमी! रुपाली चाकणकरांचा राजीनामा निश्चित? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘वर्षा’वर बोलावून राजीनाम्याचे निर्देश
Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर चाकणकरांवर टीकेचा भडीमार झाला होता. विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश दिल्याची माहिती आहे.
त्यामुळे रुपाली चाकणकरांचा राजीनामा होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. आता रुपाली चाकणकरांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.





