Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे अल्लू अर्जुनसोबतच्या आगामी ‘राका’ चित्रपटामधून देखील तिचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Deepika Padukone) काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, प्रेग्नेंसीमुळे चित्रपटातील तिची भूमिका कमी केली जाऊ शकते किंवा तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड होऊ शकते. मात्र, आता चित्रपटाच्या टीमने या प्रकरणावर मौन सोडले असून याबाबतचे उत्तर दिले आहे. ‘राका’च्या टीमने हे सर्व दावे फेटाळून लावत एका निवेदनात म्हटले आहे की, “सर्व काही नियोजनानुसार सुरू आहे. ‘राका’मध्ये दीपिका पादुकोणची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि सेटवर मोठ्या उत्साहात, कोणत्याही अडथळ्याशिवाय शूटिंग सुरू आहे. Deepika Padukone Deepika Padukone : दीपिकाचा ‘राका’मधून पत्ता कट होणार?; चित्रपटाच्या टीमने सोडलं मौन ‘राका’ सिनेमासाठी दीपिका ॲक्शन सीन्सचंही शूट करत आहे. प्रेग्नंसीतही ती पूर्ण एनर्जीने हे सीन्स पूर्ण करत आहे.” ती संपूर्ण प्रेग्नेंसी दरम्यान शूटिंग सुरू ठेवणार असून, यासाठी निर्मात्यांनीही शूटिंग दरम्यान सर्व आवश्यक खबरदारी घेतली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याआधीही तिने पहिल्या प्रेग्नंसीवेळी ‘सिंघम अगेन’ सिनेमासाठी मेहनत घेतली होती. २०२४ मध्ये तिने दुआला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर दीपिकाने ८ तासांच्या शिफ्टची मागणी केली. (Deepika Padukone) तसेच मानधनात वाढ, प्रॉफिट शेअर असा मागण्याही केल्याची चर्चा झाली होती. यामुळे तिला ‘स्पिरीट’ आणि ‘कल्की २’ या बिग बजेट सिनेमातून बाहेर पडावं लागलं होतं. दरम्यान आता दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे तिला ‘राका’ हा बिग बजेट सिनेमाही गमवावा लागेल अशी चर्चा झाली होती. Deepika Padukone हेही वाचा: Jhalmuri Recipe: घरी बनवा बंगालची झणझणीत झालमुरी; 5 मिनिटांत तयार होणारी टेस्टी रेसिपी