प्रियांका गांधींशी असभ्य वर्तन; पोलिसांनी मागितली माफी

नोएडा – कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी असभ्य वर्तन केल्याबद्दल नोएडा पोलिसांनी रविवारी दिलगिरी व्यक्त केली. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
प्रियांका गांधी या शनिवारी हाथरसमधील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत जाण्यासाठी कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी अनेक पोलिस बदडत असलेल्या कार्यकर्त्याच्या मदतीसाठी बॅरिकेड्सवरून उडी टाकून धावल्या. त्यांनी पोलिसांना रोखल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावेळी काही पोलिसांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले.
पोलिसांनी जमा झालेल्या जमावाला हाताळताना प्रियांका गांधी यांच्याशी घडलेल्या घटनेबद्दल नोएडा पोलिस दिलगिरी व्यक्त करत आहोत. या प्रकरणाची आम्ही स्वत:हून दखल घेत या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. वरीष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यामार्फत ही चौकशी केली आहे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी नोएडा पोलिस कटीबध्द आहेत, असे ट्विट नोएडा पोलिसांनी केले आहे.
— POLICE COMMISSIONERATE NOIDA (@noidapolice) October 4, 2020





