“राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश…” ; संघाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’विषयीची पहिली प्रतिक्रिया

RSS on Operation Sindoor । जम्मूच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या २६ पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्याचा बदल आता भारतीय सेनेकडून घेण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूर या नावाने भारतीय लष्कराने पाकला धडा शिकवला आहे. मात्र त्यानंतरही पाकने आपल्या कुरापती काही थांबल्या नाहीत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला कारण त्याला भारतीय सेनेनं हणून पाडले. दरम्यान, या भारतीय सैन्याच्या कामगिरीचे राष्ट्रीय सवयंसेवक संघाकडून कौतुक करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीवर अभिनंदनवर एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात संघाकडून
,”पहलगामच्या भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परिसंस्थेविरुद्ध “ऑपरेशन सिंदूर” ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन. हिंदू यात्रेकरूंच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढले आहे.” असे म्हटले आहे.
RSS tweets, ” Hearty congratulations to the leadership of the Government of India and the armed forces for the decisive action “Operation Sindoor” being taken against the Pak-sponsored terrorists and their supporting ecosystem after the cowardly terrorist incident of Pahalgam.… pic.twitter.com/GZPvyb0S3T
— ANI (@ANI) May 9, 2025
सरसंघचालक मोहन भागवत आणि सरचिटणीस दत्तात्रय दत्तात्रेय होसाबळे यांच्या नावाने समोर आलेल्या निवेदनात,”आमचा असाही विश्वास आहे की पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार आणि सशस्त्र दलांसोबत उभा आहे.” असे देखील म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. या आव्हानात्मक प्रसंगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्व देशवासीयांना सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व माहितीचे पूर्ण पालन करण्याचे आवाहन करतो. यासोबतच, या प्रसंगी, आपले नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. सर्व देशवासीयांना विनंती आहे की त्यांनी लष्कर आणि नागरी प्रशासनाला आवश्यकतेनुसार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार राहून आणि राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी देऊन त्यांची देशभक्ती प्रदर्शित करावी.” असे आवाहन देखील करण्यात येत आहे. RSS on Operation Sindoor ।





