RR vs CSK : गुवाहाटीत आज ‘महायुद्ध’! रियान विरुद्ध ऋतुराज; आकडेवारी पाहून चेन्नईचे चाहते टेन्शनमध्ये, राजस्थानचं पारडं जड?
RR vs CSK : या दोन संघांमधील ऐतिहासिक 'हेड-टू-हेड' आकडेवारी जरी अटीतटीची वाटत असली, तरी अलीकडच्या काळातील रेकॉर्ड चेन्नईची झोप उडवणारा आहे.

RR vs CSK head to head record ahead IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीतील तिसरा सामना आज, ३० मार्च रोजी गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन मातब्बर संघांमधील हा मुकाबला क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत उत्कंठावर्धक ठरणार आहे.
आज संध्याकाळी ७:३० वाजता चेन्नई आणि राजस्थान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि राजस्थानचा युवा कर्णधार रियान पराग नाणेफेकीसाठी ७:०० वाजता मैदानात उतरतील. या दोन संघांमधील ऐतिहासिक ‘हेड-टू-हेड’ आकडेवारी जरी अटीतटीची वाटत असली, तरी अलीकडच्या काळातील रेकॉर्ड चेन्नईची झोप उडवणारा आहे.
आकडेवारीचा खेळ: कोणाचं पारडं जड? RR vs CSK
The cameraman absolutely nailed this one 🎥🔥#IPL2026 #RRvsCSK pic.twitter.com/aBEtjeTRPx
— CREX (@Crex_live) March 30, 2026
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत हे दोन्ही संघ ३१ वेळा भिडले आहेत. यामध्ये चेन्नईने १६ वेळा तर राजस्थानने १५ वेळा बाजी मारली आहे. मात्र, गेल्या १० सामन्यांचे चित्र पाहिले तर राजस्थानने चेन्नईवर प्रचंड वर्चस्व गाजवले आहे. गेल्या १० सामन्यांपैकी राजस्थानने तब्बल ८ सामने जिंकले आहेत, तर चेन्नईला केवळ २ सामन्यांत विजय मिळवता आला आहे.
गेल्या ५ सामन्यांत राजस्थानचा ‘रॉयल’ दबदबा – RR vs CSK
चेन्नईच्या चाहत्यांसाठी चिंतेची बाब म्हणजे गेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामन्यांत राजस्थानने चेन्नईला धूळ चारली आहे. २०२५ च्या हंगामातील दोन्ही लढती राजस्थानने जिंकल्या होत्या. चेन्नईला राजस्थानविरुद्धचा शेवटचा विजय २०२४ मध्ये (५ गडी राखून) मिळाला होता. त्याआधी २०२१ मध्ये चेन्नईने राजस्थानला हरवले होते.
आजच्या सामन्यात धोनी आणि ब्रेव्हिस यांच्या अनुपस्थितीत चेन्नई हा नकोसा रेकॉर्ड पुसून काढणार की रियान परागच्या नेतृत्वाखाली राजस्थान आपला दबदबा कायम राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. संजू सॅमसन आता चेन्नईच्या गोटात असल्याने या सामन्याला वेगळीच धार आली आहे. RR vs CSK





