Sanjay Raut : “आर.आर. पाटील गृहमंत्री म्हणून चुकले नाहीत” – संजय राऊत

मुंबई – आर. आर. पाटील यांचे केस फार लहान होते, ते केसाने गळाने कापू शकत नाहीत. अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार असे या राज्याचे ते गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांनी कधी गृहमंत्री म्हणून चुकीचे काम केले असे आम्हाला वाटत नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
राऊत पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार यांनी काल आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्यावर सही केल्याचे जनतेला दाखवले. तसेच फडणवीस यांनी मला सही केल्याचे दाखवले, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
कारण त्या दोघांनी संविधानानुसार गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर अशी माहिती सार्वजनिक करणे हा गोपनीयतेचा भंग आहे आणि फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.





