RCB register highest score against RR in IPL history : आयपीएल २०२५ च्या ४२ व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली. आरसीबीने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २०५ धावा केल्या. या धावसंख्येसह आरसीबीने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. खरं तर, आरसीबीने राजस्थानविरुद्ध आयपीएलमधील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. आरसीबीने यापूर्वी कधीही आरआरविरुद्ध इतकी मोठी धावसंख्या उभारली नव्हती.
आरसीबीने रॉजस्थान रॉयल्सविरुद्ध नोंदवली आपली सर्वोच्च धावसंख्या –
याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सर्वोच्च धावसंख्या ७ बाद २०० धावा होती. आरसीबीने २०१५ मध्ये राजस्थानविरुद्ध याच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ही धावसंख्या उभारली होती. त्या सामन्यात, एबी डिव्हिलियर्सने आरसीबीकडून ४५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. याशिवाय, सर्फराझ खानने २१४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २१ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे राजस्थान रॉयल्स फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.
We’ve posted our highest total for the season at the Chinnaswamy!
Half job done, over to the other half now. 👊#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 #RCBvRR pic.twitter.com/T05ZJbUjrE
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 24, 2025
विराट कोहली (७०) आणि देवदत्त पडिक्कल (५०) यांच्या अर्धशतकांच्या आणि या दोघांमधील दुसऱ्या विकेट्ससाठी ९५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पाच बाद २०५ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला २०६ धावांचे लक्ष्य दिले.
हेही वाचा – RCB vs RR : विराट कोहलीने रचला इतिहास! चिन्नास्वामी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
या सामन्यात कोहलीने ४२ चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले, तर पडिक्कलने २७ चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकार मारले. आरसीबीकडून फिल सॉल्टने २६ धावा, टिम डेव्हिडने २३ धावा आणि जितेश शर्माने नाबाद १९ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने दोन तर जोफ्रा आर्चर आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.