#IPL2023 #RCBvMI : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टाॅस जिंकला, कर्णधार डुप्लेसिसने घेतला ‘हा’ निर्णय

बेंगळुरू :- आयपीएलच्या पाचव्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)शी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात प्रथमच भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत.
बंगळुरूने गेल्या काही हंगामांत आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे गेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय लाजीरवाणी राहिली होती. कारण मुंबई संघाला 14 पैकी केवळ चार सामने जिंकता आले होते. पण या मोसमात मुंबईचा संघ पूर्वीपेक्षा सरस दिसत आहे. त्यामुळे दोन्ही संघांत तुल्यबळ लढत अपेक्षित आहे.
दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरू होणार असून खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास ती फलंदाजांना अनुकूल आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या बाजूनं लागला आहे. बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने गोलंदाजीचा निर्णय (Royal Challengers Bangalore won the toss and elected to field) घेत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
आपली 𝐁𝐀𝐓𝐓𝐈𝐍𝐆 आहे! 🪙
RCB have won the toss & they will bowl first 💪#OneFamily #RCBvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2023
दरम्यान, बंगळुरू आणि मुंबई यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांची एकूण आकडेवारी पाहिली, तर मुंबईचा संघ खूप पुढे आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने 13 तर मुंबईने 17 सामने जिंकले आहेत.परंतु अखेच्या 5 सामन्यांकडे पाहिल्यास बंगळुरूचे पारडे जड दिसते. कारण दोन्ही संघांतील गेल्या पाच सामन्यांत मुंबई संघाला केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे.





