Satara News : गिरिस्थान प्रशालेत रोटरी क्लबच्या वतीने मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन

महाबळेश्वर : स्त्री सशक्ती करणाच्या दिशेने एक पाऊल टाकत, रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर यांच्या वतीने गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या बरोबर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री सुरेश साबू यांनी विद्यार्थिनींशी आत्मीयतेने संवाद साधत हिमोग्लोबिन तपासणीचे महत्त्व, योग्य आहाराचे आरोग्यासाठी फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी शाळां विषयी विशेष जिव्हाळा व्यक्त करत अशा उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.तसेच या वेळी सौ.साबू देखील आवर्जून उपस्थित होत्या.
या शिबिरात पॅथॉलॉजीस्ट सौ. शुभांगी येवले यांनी विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन चाचणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आरोग्या संबंधी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी देखील सशक्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य! या संकल्पनेला बळ देणारा समाजोपयोगी उपक्रम प्रशालेत आयोजित केल्याबद्दल सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या.या उपक्रमाला विद्यार्थिनींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याच प्रमाणे प्रशालेचे प्राचार्य श्री. पी.आर. माने सर यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक अभिषेक साळुंखे यांनी केले. तसेच सौ. ऋजुता दीक्षित मॅडम, श्री.कानडे सर, श्री.राहूल आखाडे सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
सदर कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष श्री दिनेश भिसे, सौ. स्वाती भांगडिया, प्रा. गणेश कोरे,श्री. शिरीष गांधी, श्री. ब्रिजभुषण सिंग हे सदस्य उपस्थित होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री. विजय काळे यांनी आभार मानले.





