#Ashes : रोरी बर्न्सचे दमदार शतक, इंग्लंड मजबूत स्थितीत

बर्मिंगहॅम – रोरी बर्न्स व जो रूट यांनी केलेल्या शानदार भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने ऍशेस क्रिकेट मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियास दमदार उत्तर दिले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 284 धावांना उत्तर देताना इंग्लंडच्या पहिल्या डावात 71.4 षटकांत 4 बाद 210 धावा झाल्या असून इंग्लंड अजूनही 74 धावांनी पिछाडीवर आहे. सध्या खेळपट्टीवर सलामीवीर रोरी बर्न्स 101 आणि बेन स्टोक्स 07 धावांवर खेळत आहेत.
? YEEEEESSSS @roryburns17!!! ?
MAIDEN TEST CENTURY!!
Scorecard/Clips: https://t.co/S6XCxN7Zbj#Ashes pic.twitter.com/kQ1XGVVQmU
— England Cricket (@englandcricket) August 2, 2019
जेम्स पॅट्टिसनने जेसन रॉयला 10 धावांवर बाद करीत इंग्लंडला पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर बर्न्स व रूट यांनी आत्मविश्वासाने खेळ केला. त्यांनी शतकी भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. त्यानंतर जो रूट 57, जो. डेनली18 आणि जोस बटलर 5 धावांवर बाद झाला.





