Scuba Diving : टीव्हीवरील लोकप्रिय कपलचा रोमॅंटिक अंदाज; अनोख्या पद्धतीने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज
Scuba Diving : मॉरिशसच्या ट्रीपमधील अनोखा अंदाज

Scuba Diving : टीव्हीवरील लोकप्रिय कपल करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश आपल्या रोमॅंटिक अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मॉरिशसमधील सुट्टीदरम्यानचा त्यांचा एक खास क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोघांनी असा एक आठवणीत राहणारा क्षण तयार केला आहे, जो त्यांच्या कायम लक्षात राहिलं.
करण कुंद्राने नुकताच या शानदार ट्रिपचा एक ट्रॅव्हल व्लॉग अपलोड केला होता, ज्यामध्ये या कपलच्या ॲडव्हेंचर्सची झलक पाहायला मिळाली. यात स्कूबा डायव्हिंग करताना करणनं तेजस्वीला पुन्हा एकदा प्रपोज केलं. तेजस्वीनेही हसत त्याच्या प्रपोजलला प्रतिसाद दिला. त्यांच्या अनोख्या प्रपोजने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Scuba Diving)
स्कुबा डायव्हिंगदरम्यान, करण आणि तेजस्वीने पाण्याखालील अद्भुत जग अनुभवले आणि त्यानंतर एक खूपच सुंदर क्षण शेअर केला. दोघांनी आधी आपल्या हातांनी हृदयाचा आकार बनवून काहीही न बोलता एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केले. यानंतर करण पाण्याखाली एका पायावर बसला आणि तेजस्वीला लग्नाची मागणी घालत प्रपोज केले. जरी ते पाण्याखाली बोलू शकत नव्हते, तरी त्यांच्या हावभावांवरून आणि इशारांवरून त्यांच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. (Scuba Diving)
View this post on Instagram
करणने आवाज न करता ‘आय लव्ह यू’ म्हटले आणि तेजस्वीने हसऱ्या चेहऱ्याने त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे पाण्याखालील हे प्रपोजल त्यांच्या सुट्ट्यांमधील सर्वात खास आठवणींपैकी एक बनले. या व्हिडीओनंतर करण-तेजस्वी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आलं आहे.
बिग बॉस १५’ मधून सुरू झाली लव्ह स्टोरी (Scuba Diving)
करण आणि तेजस्वी यांची प्रेमकथा ‘बिग बॉस १५’ च्या घरापासून सुरू झाली होती, जिथे या रिॲलिटी शोदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून ते मनोरंजन विश्वातील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक बनले आहेत.
हेही वाचा:





