Rohit Virat Entry : वडोदऱ्यात ‘रो-को’चे जंगी स्वागत! कपाटातून झाली रोहित-विराटची अनबॉक्सिंग एन्ट्री; पाहा VIDEO

Rohit Virat cupboard entry video viral : रविवार, ११ जानेवारी २०२६ हा दिवस वडोदऱ्याच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. कोटांबी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला सामना हा या मैदानावरील पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामना ठरला. हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय करण्यासाठी बडोदा क्रिकेट असोसिएशनने (BCA) अशी काही तयारी केली होती की, प्रत्यक्ष मैदानावरील प्रेक्षकच नव्हे तर सोशल मीडियावरील चाहतेही थक्क झाले.
अलमारी उघडली अन् रोहित-विराट बाहेर आले!
या सामन्याच्या ‘मिड-इनिंग ब्रेक’ दरम्यान प्रेक्षकांना एक अभूतपूर्व नजारा पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनजवळ एक विशाल कपाट (Cupboard) ठेवण्यात आले होते, ज्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मोठे पोस्टर्स होते. जसा अनाऊन्सरने या दोन दिग्गजांच्या नावांचा जयघोष केला, तशी त्या कपाटाची दारे उघडली आणि हसतमुख रोहित आणि विराट बाहेर आले. एखाद्या प्रॉडक्टच्या ‘अनबॉक्सिंग’ स्टाईलने झालेल्या या एन्ट्रीने स्टेडियममध्ये हास्याची लाट पसरली. या ‘अनबॉक्सिंग सेरेमनी’चे व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
A fitting felicitation for two ODI legends 👑
Virat Kohli & Rohit Sharma ❤️📸: JioHotstar
#ViratKohli #RohitSharma #RoKo #TeamIndia #ODICricket #IndianCricket pic.twitter.com/k1O5GhJcaV— Cricadium (@Cricadium) January 11, 2026
जय शाह यांच्या हस्ते खास गौरव –
The way they both were laughing😅❤
– This is the best clip of both of them{Virat Kohli×Rohit Sharma}pic.twitter.com/BUN7gyS4kH
— Gillfied⁷ (@Gill_Iss) January 11, 2026
या खास प्रसंगी आयसीसीचे (ICC) नवनिर्वाचित अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआय प्रमुख मिथुन मनहास उपस्थित होते. त्यांनी खेळपट्टीजवळ जाऊन या दोन्ही महान खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले आणि भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली.
हेही वाचा – Virat Kohli Record : ‘किंग’ कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा वर्ल्डरेकॉर्ड! कुमार संगकारालाही टाकलं मागे
किवींचे ३०१ धावांचे आव्हान –
नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार शुबमन गिलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी शतकी सलामी देत भारताची चिंता वाढवली होती. मात्र, मधल्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. ज्यामुळे भारतीय संघाने न्यूझीलंड ८ बाद ३०० धावांवर रोखले. किवींकडून डेरिल मिचेलने सर्वाधिक ८४ धावांची वादळी खेळी साकारली. भारताकडून प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर कुलदीपने एक विकेट घेतली.





