Rohit-Virat Comeback : तारीख ठरली ! ‘या’ दिवशी रोहित-विराट भारतीय संघात करणार पुनरागमन

आशिया चषक 2025 चा 20 दिवसांचा थरार अखेर संपला असून, अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारतीय क्रिकेट संघाने ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. फायनलमधील विजय, त्यानंतरचा नाट्यमय वाद आणि ट्रॉफी स्वीकारण्यावरून झालेली चर्चा क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात कायम राहील. मात्र, आता चाहत्यांचं लक्ष भारतीय संघाच्या पुढील वाटचालीकडे लागलं आहे. विशेषतः, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना पुन्हा एकदा नीळ्या जर्सीत मैदानात उतरताना पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
रोहित-विराटचं पुनरागमन
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन करणार आहेत. दोघांनीही टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, आता ते केवळ एकदिवसीय (वनडे) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुन्हा मैदानात दिसतील. ही मालिका ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार असून, पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात रोहित आणि विराट यांचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
भारताचं आगामी शेड्यूल
आशिया चषकानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत उतरणार आहे. या मालिकेत फक्त दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेसाठी सज्ज आहे. मालिकेचा पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होईल, तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत वि. वेस्ट इंडिज कसोटी मालिका 2025
पहिली कसोटी : 2-6 ऑक्टोबर, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद
दुसरी कसोटी : 10-14 ऑक्टोबर, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
चाहत्यांमध्ये उत्साह
आशिया चषकातील विजयानंतर भारतीय संघ आता नव्या आव्हानांसाठी सज्ज होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित आणि विराट यांच्या अनुभवाची जोड संघाला बळ देईल. क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणी असून, नीळ्या जर्सीतील भारतीय संघ पुन्हा एकदा मैदान गाजवण्यास तयार आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे शेड्यूल
पहिली वनडे : 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)
दुसरी वनडे: 23 ऑक्टोबर (एडिलेड ओवल)
तिसरी वनडे: 25 ऑक्टोबर (एस सी ग्राउंड)
पहिला टी20 सामना : 29 ऑक्टोबर (मनुका ओवल)
दूसरा टी20 सामना : 31 ऑक्टोबर (एमसीजी)
तीसरा टी20 सामना : 2 नोव्हेंबर (बैलेरीव ओवल)
चौथा टी20 सामना : 6 नोव्हेंबर (हेरिटेज बैंक स्टेडियम)
पाचवा टी20 सामना : 8 नोव्हेंबर (गाबा स्टेडियम)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडिया मायदेशी परतेल आणि 14 नोव्हेंबरपासून घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धया घरच्या कसोटी मालिकेसाठी खेळणार आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळली जाईल.
भारत वि. दक्षिण अफ्रीका 2025
पहिली टेस्ट: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
दूसरी टेस्ट: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
पहिली वनडे: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
दूसरी वनडे: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंह इंटरनेशनल स्टेडियम)
तिसरी वनडे: 6 डिसेंबर (एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
पहिला टी20 सामना : 9 डिसेंबर (बाराबती स्टेडियम)
दूसरा टी20 सामना : 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)
तिसरा टी20 सामना : 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)
चौथा टी20 सामना : 17 डिसेंबर (इकाना स्टेडियम)
पाचवा टी20 सामना : 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)





