रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’पूर्वी चाहत्यांना दिले सरप्राइज

Singham Again Film | रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवाळीमध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘सिंघेम अगेन’ प्रदर्शित होण्याआधी रोहित शेट्टीने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.
2011 मध्ये आलेला अजय देवगणचा ‘सिंघम’ हा चित्रपट आता पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 18 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात पुन्हा पाहता येणार आहे. अजय देवगनच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. त्यामुळेच आता 2011 मध्ये आलेला ‘सिंघम’ हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. Singham Again Film |
2011 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात अजय देवगणने बाजीराव नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटात रोमान्स, कॉमेडी आणि ॲक्शनचाही धमाका पाहायला मिळाला. या चित्रपटातील अजय देवगणचा ‘आता माझी सटकली’ हा डायलॉगही खूप गाजला. आता रोहित शेट्टी सिंघम अगेन घेऊन येत आहे. Singham Again Film |
या चित्रपटात अजय देवगन, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.





