Rohit Sharma : ‘या फॉरमॅटसाठी एकाग्रता ही सर्वात महत्वाची गोष्ट…’, निवृत्तीनंतर रोहित शर्मा काय म्हणाला? पाहा VIDEO

मुंबईत कार्यक्रमात सहभागी झाले रोहित –
रोहित शर्मा सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत असून, या प्रकारात तो संघाचे कर्णधारपदही सांभाळत आहे. भारतीय संघ सध्या एकदिवसीय सामने कमी खेळत असल्याने रोहितही मैदानावर दिसत नाही. दरम्यान, सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होत त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
रोहित शर्मा कसोटी क्रिकेटबद्दल काय म्हणाला?
Rohit Sharma on test Cricket : “Test Cricket is mentally very challenging and draining”
Rohit Sharma’s full speech from today’s event of CEATtyres.❤️ pic.twitter.com/FG9Vz0Bvi5
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 25, 2025
सीईएटी टायरच्या कार्यक्रमादरम्यान रोहित म्हणाला, “कसोटी क्रिकेटसाठी खूप तयारी करावी लागते. या खेळात तुम्हाला मैदानावर बराच वेळ घालवावा लागतो. कसोटी क्रिकेटमध्ये पाच दिवस खेळावे लागतात, जे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक आणि थकवणारे आहे.” त्याने पुढे सांगितले की, प्रत्येक क्रिकेटपटू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतच मोठा होतो.
एक प्रकारची शिस्त शिकवतो –
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “जेव्हा आपण स्पर्धात्मक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, तेव्हा मुंबईतही क्लब क्रिकेटचे सामने दोन किंवा तीन दिवस चालतात, अशा प्रकारे आपण लहानपणापासूनच त्यासाठी तयार असतो. यामुळे तुमच्या मार्गावर येणाऱ्या परिस्थितींना तोंड देणे थोडे सोपे होते. सर्वच तरुण खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या तयारीचे महत्त्व समजत नाही, परंतु हळूहळू त्यांना त्याचे महत्त्व कळू लागते. तुम्हाला खेळात आवश्यक असलेली एक प्रकारची शिस्त शिकवतो.”
एकाग्रता ही सर्वात महत्वाची गोष्ट असते –
हिटमॅन पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही सर्वात लांब फॉरमॅट खेळत असता तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागते आणि एकाग्रता ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. कारण तुम्हाला खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते आणि त्यासाठी मानसिकदृष्ट्या ताजेतवाने असणे महत्वाचे आहे.”





