Rohit Sharma : रोहित शर्मा बनला लॉर्ड्सचा राजा! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात आपल्या वनडे कारकिर्दीतील ३२ वे दिमाखदार शतक झळकावले आहे.

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात आपल्या वनडे कारकिर्दीतील ३२ वे दिमाखदार शतक झळकावले आहे.त्याने आपल्या खेळीत ११० चेंडूत १३८ रन केले. यामध्ये १७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.
लॉर्ड्सच्या या मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज (Rohit Sharma) ठरला असून, या ऐतिहासिक खेळीसह रोहितने लॉर्ड्सच्या प्रतिष्ठित ‘ऑनर्स बोर्ड’वर आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला वनडेत शतकी टप्पा ओलांडता आला नव्हता. यापूर्वी २००४ मध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेली ९० धावांची खेळी ही कोणत्याही भारतीय फलंदाजाची या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या होती. तब्बल दोन दशकांनंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) हा शतकी दुष्काळ संपवला आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर रोहित शर्माचे हे आठवे वनडे शतक ठरले आहे.
विक्रमी धावसंख्येचा पाठलाग आणि अभेद्य भागीदारी
इंग्लंडच्या संघाने भारतासमोर ३८८ धावांचे विशाल आणि विक्रमी आव्हान ठेवले होते. या कठीण लक्षाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल या जोडीने अत्यंत संयमी सुरुवात केली. खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी रोहितने सुरुवातीला काही वेळ घेतला, मात्र एकदा सेट झाल्यावर त्याने आपल्या भात्यातील क्लासिक आणि आक्रमक फटक्यांचे प्रदर्शन करत मैदानाचा ताबा घेतला. रोहित आणि गिल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १४६ चेंडूंमध्ये १४७ धावांची भक्कम भागीदारी रचत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने मजबूत स्थितीत आणून ठेवले.

रोहित शर्माने रचला महाइतिहास! मोहिंदर अमरनाथ यांचा ‘तो’ जुना विक्रम मोडीत; ३९ व्या वर्षी मैदान गाजवणारा ठरला भारताचा पहिलाच खेळाडू
निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम; २०२७ च्या वर्ल्ड कपचे संकेत
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. त्यामुळे, रोहित शर्मा (Rohit Sharma) लॉर्ड्सच्या मैदानात आपला शेवटचा वनडे सामना खेळत असून तो लवकरच निवृत्ती घेणार, अशा चर्चांना उधाण आले होते. या अफवांमुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या या बातम्यांनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला स्वतः समोर येत स्पष्टीकरण द्यावे लागले. बीसीसीआयने रोहितच्या निवृत्तीच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या आणि तो आजही टीम इंडियाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले.
या सर्व चर्चांना रोहितने आपल्या बॅटनेच चोख उत्तर दिले. लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतक झळकावत त्याने आपण अजूनही ‘किंग’ आहोत हे सिद्ध केले असून, २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्याचा शड्डू ठोकल्याचे संकेत या खेळीतून दिले आहेत.





