Rohit Sharma Record : ‘हिटमॅन’चा मोठा धमाका! ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत रोहित शर्माने रचला इतिहास; टीकाकारांना बॅटने दिले चोख उत्तर
Rohit Sharma Record : भविष्याबाबत सुरू असलेल्या या तीव्र वादानंतर रोहित शर्माने मैदानावर उतरून आपल्या बॅटने या सर्व अटकळांना जोरदार उत्तर दिले आहे.

Rohit Sharma Breaks Chris Gayle Record Most Sixes vs SENA Nations : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर रोहित शर्माचा वनडे क्रिकेटमधील निवृत्तीच्या चर्चांनी क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रोहितला २०२७ च्या विश्वचषक योजनांमधून वगळण्याचे संकेत दिल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. यशस्वी जैस्वाल सारख्या तरुणांना संधी देण्यासाठी निवड समितीने इंग्लंड मालिकेपासूनच पुढे जाण्याचा विचार केला होता. मात्र, भविष्याबाबत सुरू असलेल्या या तीव्र वादानंतर रोहित शर्माने मैदानावर उतरून आपल्या बॅटने या सर्व अटकळांना जोरदार उत्तर दिले आहे.
ख्रिस गेलचा ‘तो’ जागतिक विक्रम मोडीत!
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात रोहित शर्माने दबाव झुगारून अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. या खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील एका अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक महाविक्रमावर आपले नाव कोरले. रोहित शर्मा आता ‘सेना’ (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने वेस्टइंडीजचा ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा ३४२ षटकारांचा जागतिक रेकॉर्ड उद्ध्वस्त केला आहे.
‘सेना’ देशांविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार:
- रोहित शर्मा – ३४३ षटकार*
- ख्रिस गेल – ३४२ षटकार
- विराट कोहली – १७९ षटकार
निवृत्तीच्या वादळात ‘हिटमॅन’चा जलवा कायम –
Age is just a number when you’re Rohit Sharma. 👑🇮🇳
63rd ODI Fifty ✔️
Oldest Indian to score a 50+ in England (ODIs) ✔️
39 years, 80 days… and still leading from the front! 🔥🏏
The Hitman continues to rewrite history. 💙#RohitSharma #Hitman #TeamIndia #INDvsENG #ODICricket pic.twitter.com/NiHNFXNgXj— SportsTiger (@The_SportsTiger) July 19, 2026
निवड समिती किंवा संघ व्यवस्थापन रोहितच्या भविष्याबाबत काहीही विचार करत असले, तरी मैदान गाजवण्याची त्याची ताकद आजूनही तशीच अबाधित आहे, हेच रोहितने दाखवून दिले. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात त्याने या ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली. या यादीत भारताचा विराट कोहली १७९ षटकारांसह खूप मागे आहे. रोहितच्या या वादळी रूपामुळे निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आपल्या आगामी रणनीतीवर पुन्हा एकदा विचार करावा लागू शकतो.





