Rohit Ritika Video : रोहित शर्माच्या नाराजीचं कारण काय? अहमदाबादमध्ये रितिकाने पतीचा हात हातात घेऊन नेमकं काय सांगितलं?
Rohit Ritika Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा सीमारेषेबाहेर उभा असून रितिका बॅरेकेट्सच्या पलीकडे उभी आहे.

Rohit Ritika Video Viral : भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर नाव कोरल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर असलेल्या रोहित शर्माचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित आणि रितिका यांच्यातील केमिस्ट्री पाहून चाहते पुन्हा एकदा या जोडीच्या प्रेमात पडले आहेत.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा सीमारेषेबाहेर उभा असून रितिका बॅरेकेट्सच्या पलीकडे उभी आहे. मैदानात मोठ्या प्रमाणावर गोंगाट असल्यामुळे रितिका रोहितचा हात हातात घेऊन त्याला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सुरुवातीला रोहितच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर भाव आणि नाराजी दिसते, ज्यामुळे अनेकांनी त्यांच्यात वाद झाला की काय, असा तर्क लावला. मात्र, रितिकाने ज्या पद्धतीने त्याला मनवून शेवटी हसायला लावले, ते पाहून ही जोडी ‘परफेक्ट कपल गोल’ सेट करत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.
Rohit Sharma doesn’t seem to agree with something Ritika bhabhi is saying, but she is trying her best to explain it to him today at Narendra Modi Stadium.😂❤️
Best Jodi my favourit🫂❤️ pic.twitter.com/MmEymgymDm
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 8, 2026
रोहितसाठी ‘त्या’ पराभवाचा बदला पूर्ण –
अहमदाबादचे हेच मैदान होते जिथे २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित शर्माला पराभवामुळे अश्रू अनावर झाले होते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलग दुसरे जेतेपद मिळवून या मैदानातील पराभवाची मालिका खंडित केली. आपल्या शिलेदारांनी मिळवलेला हा विजय पाहून रोहितच्या चेहऱ्यावरही विजयाचा आनंद ओसंडून वाहताना दिसला.
२०२३ च्या जखमांवर विजयाची फुंकर
१९ नोव्हेंबर २०२३ रोजी याच मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचे शल्य प्रत्येक भारतीयाच्या मनात होते. त्यामुळे ८ मार्च रोजी जेव्हा भारत पुन्हा एकदा अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा चाहत्यांच्या मनात धाकधूक होती. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने भूतकाळ विसरून नव्या जिद्दीने खेळत इतिहास रचला.
प्रशिक्षकांच्या रणनीतीचे पाकिस्तानकडूनही कौतुक
भारतीय संघाच्या या यशात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. कट्टर टीकाकार असलेल्या शोएब अख्तरनेही मान्य केले की, कठीण काळात खेळाडूंवर दाखवलेला विश्वास हीच बाब भारताला विजेते बनवण्यासाठी निर्णायक ठरली आहे.





