Rohit Sharma : ‘बीसीसीआयला लाज आहे का?’, रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने चाहत्यांचा संतप्त सवाल

Fans react on Rohit Sharma : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. या घोषणेत सर्वात मोठा धक्का म्हणजे रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज शुबमन गिलची वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माने यापूर्वीच कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, तो आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळतो.
रोहित शर्माने वनडे फॉर्मेटमध्ये भारतीय संघाला नवी उंची गाठून दिली होती. त्याच्या नेतृत्वाखाली २०२३ च्या वनडे विश्वचषकात संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. यामुळे चाहत्यांना अपेक्षा होती की तो २०२७ च्या वनडे विश्वचषकापर्यंत संघाचे नेतृत्व करेल. मात्र, बीसीसीआय आणि निवड समितीने घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
चाहत्यांचा संताप आणि सोशल मीडियावर ट्रेंड :
बीसीसीआयच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. #WeStandWithRohit आणि #ShameOnBCCI हे हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. चाहत्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. रोहितच्या कर्णधारपदातील शानदार कामगिरी आणि २०२३ च्या विश्वचषकातील त्याच्या नेतृत्वाची आठवण करून देत अनेकांनी भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहितला कर्णधारपदावरून हटवणे धक्कादायक, गिलला अजून वेळ होता…’, हरभजन सिंगचं वक्तव्य
चाहत्यांनी रोहित शर्मासाठी दिलेल्या प्रतिक्रियाने वेधलं लक्ष –
Do you have any shame left BCCI?
— Kantala fc (@ifOnlyKantala) October 4, 2025
रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर एका संतप्त चाहत्याने लिहलं की, “बीसीसीआयला लाज आहे का?”
Fan wars aside, he gave everything to Team India during his captaincy, yet the BCCI is treating him like a dog. Rohit Sharma deserves better. 💔 pic.twitter.com/id7VEhpEw4
— ‘ (@viratkohli_un) October 4, 2025
दुसऱ्या चाहत्याने म्हणलं की, “फॅन वॉर बाजूला ठेवा, रोहित शर्माने आपल्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला सर्व काही दिले. तरीही बीसीसीआय त्याच्याशी असं वागत आहे.”
तिसऱ्या चाहत्याने लिहलं की “रोहित शर्मा, आता वेळ आली आहे की तू गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांच्या तोंडावर डबल सेंचुरी मारावी.”
Dream of 2027 worldcup for Rohit Sharma is over. 💔
They don’t deserve a successful captain .
We lost again
Politics won again 🥲— RohitianClub👀 (@_SaNaTaNi_BaLak) October 4, 2025
चौथा चाहता म्हणाला, “रोहित शर्माचं २०२७ विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. तो यशस्वी कर्णधारपदाचा हकदार नव्हता का? आम्ही पुन्हा हरलो, राजकारण पुन्हा जिंकलं.”
Removing Rohit Sharma from captaincy isn’t just unfair — it’s pure disrespect to a legend. 💔
Gautam Gambhir & Ajit Agarkar, how can you forget so quickly what this man has done for Indian cricket?#Rohit #Gill #RohitSharma pic.twitter.com/VM3e3sXItq
— 𝑺𝒂𝒄𝒉𝒊𝒏 𝑱𝒂𝒏𝒈𝒓𝒂 – सचिन जांगड़ा 🇮🇳 (@sachujangra) October 4, 2025
पाचव्या चाहत्याने लिहलं की, “रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवणं हा केवळ अन्याय नाही, तर एका दिग्गज खेळाडूचा सरळ अपमान आहे. गंभीर आणि आगरकर, तुम्ही इतक्या लवकर विसरलात का की या खेळाडूने भारतीय क्रिकेटसाठी काय केलं?”





