Rohit Sharma : ‘…म्हणून हार्दिक पंड्याला किस केलं होतं’, रोहित शर्माने केला खुलासा

Rohit Sharma opens up on Hardik Pandya Kiss : आयपीएल २०२४ च्या आधी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील तणावपूर्ण संबंधांबाबत बातम्या येऊ लागल्या होत्या. आयपीएलच्या सतराव्या हंगामात रोहितच्या चाहत्यांनी हार्दिकला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. मैदानावरही त्याला प्रेक्षकांनी जोरदार हूटिंग केले. मात्र, त्यानंतर हे दोन्ही खेळाडू टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये एकत्र खेळताना दिसले. टीम इंडियाने ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितने मैदानावर हार्दिकचे चुंबन घेतले. याबाबत आता प्रथमच रोहित शर्माने मोकळेपणाने भाष्य केले आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम षटकात हार्दिक पांड्याने अप्रतिम गोलंदाजी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि पांड्या दोघेही खूप भावूक झाले होते. त्या भावनिक क्षणी रोहितने पंड्याचे चुंबन घेतले, ज्याची तेव्हा खूप चर्चा झाली होता. आता यासंदर्भात जिओहॉटस्टारच्या मुलाखतीत रोहित शर्माने खुलासा केला आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला?
Rohit Sharma said, “this was an emotional moment. Hardik is my man, he did the job for me and the team otherwise we would’ve been sitting without anything in our hands”. (JioHotstar). pic.twitter.com/L2XEZ7Dgb0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 26, 2025
हार्दिकचे चुंबन घेण्याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “तो खूप भावनिक क्षण होता. हार्दिक माझा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने माझ्यासाठी आणि संघासाठी मैदानावर मेहनत घेतली, अन्यथा आजही सगळे रिकाम्या हाताने बसले असते.” हार्दिक पंड्या आता भारतीय क्रिकेट संघासाठी मोठा मॅचविनर बनला आहे. आयपीएल २०२४ पर्यंत हार्दिकवर खूप टीका होत होती. पण त्यानंतर त्याचा दर्जा भारतीय संघात आणखी वाढला.
हेही वाचा – Rajasthan Royals : राज कुंद्रा पुन्हा वादात! राजस्थान रॉयल्सच्या मालकाचा ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप
हार्दिक टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर –
जरी हार्दिक पंड्या भारतीय संघाचा पुढील कर्णधार बनण्यात कमी पडला, तरी तो आज सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू आहे. तो टी-२० संघाचा कर्णदार होण्याचा प्रबळ दावेदार होता. मात्र, ऐनवेळी कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादवचा नंबर लागला. टी-२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली, जिथे भारतीय संघाने ट्रॉफी जिंकली. या दोन्ही स्पर्धांनंतर हार्दिक आणि रोहित शर्मा यांच्यातील नाते खूप चांगले झाले आहे





