Rohit Sharma : हिटमॅनने वयाच्या ३८व्या वर्षी रचला इतिहास! वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७३ धावांची खेळी केल्यानंतर सिडनीत नाबाद १२१ धावांची खेळी करणाऱ्या रोहितने क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेऊन अव्वल स्थान पटकावलं. रोहितने वनडेत ३३ वे शतक ठोकत विराट कोहली (७४*) याच्यासह अभेद्य भागीदारी करत भारताला तिसऱ्या वनडेत ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. मात्र, टीम इंडियाला मालिका वाचवता आली नाही.
इब्राहिम झादरान आणि गिलला टाकलं मागे
रोहितने अफगानिस्तानच्या इब्राहिम झादरान आणि शुबमन गिलला मागे टाकत वनडेतील फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. गेल्या दशकात रोहित बहुतेक वेळा अव्वल १० मध्ये होता. रोहितसोबतच फिरकीपटू अक्षर पटेलला सिडनीतील उत्कृष्ट कामगिरीचा लाभ मिळाला. अक्षर वनडे गोलंदाजांच्या यादीत सहा स्थानांनी वरचढ होऊन ३१व्या, तर वनडे अष्टपैलूंच्या क्रमवारीत चार स्थानांची प्रगती करत आठव्या क्रमांकावर पोहोचला.
हेही वाचा – IND vs AUS : सूर्यकुमार यादवने धोनीला टाकलं मागे, ‘थाला’चा मोडला ‘हा’ खास विक्रम
कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी –
A golden 2025 for Rohit Sharma in ODIs. 🫡🇮🇳#Cricket #Rohit #India #ODI pic.twitter.com/8w5Bb1a1aC
— Sportskeeda (@Sportskeeda) October 29, 2025
हे लक्षात घेण्यासारखे आहे की रोहित शर्मा यापूर्वी कधीही एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला नव्हता. त्याची याआधीची सर्वोत्तम कामगिरी २०१९ च्या विश्वचषकात होती, जेव्हा त्याने पाच शतके झळकावली आणि ८८२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. यावेळी, त्याने तो अपूर्ण प्रवास पूर्ण केला आहे आणि विक्रम मोडले आहेत, ज्यामुळे त्याचे पुनरागमन आणखी ऐतिहासिक झाले आहे.
हेही वाचा – IND vs AUS : पाऊस आला धावून, सामना गेला वाहून! भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-२० सामना रद्द
वनडे गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा फिरकीपटू मिशेल सँटनर तीन स्थानांच्या प्रगतीसह चौथ्या, तर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आठव्या स्थानावर पोहोचला. इंग्लंडचा हॅरी ब्रूक २३ स्थानांची मोठी झेप घेत वनडे फलंदाजांच्या यादीत २५व्या स्थानावर पोहोचला.





