दुबई – भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती करण्याची संधी आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली 776 गुणांसह पाचव्या स्थानावर असून रोहित 773 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कोहलीला मागे टाकण्यासाठी रोहितला केवळ तीन गुणांची गरज आहे.
त्यातच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांत कोहलीला मोठी खेळी करण्यास अपयश आले व रोहितने एक मोठी खेळी केल्यास तो कोहलीला मागे टाकून पाचव्या स्थानावर झेप घेऊ शकतो.
येत्या 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने 50 हून अधिक किंवा शतकासारखी मोठी खेळी साकारल्यास तो क्रमवारीत पुढे जाऊ शकेल.