MI vs GT : रोहित शर्माने सिराजला दिलं खास गिफ्ट! बीसीसीआयने शेअर केला VIDEO

Rohit Gifts a Diamond Ring Siraj ahead MI vs GT match in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाचे १६ गुण होतील आणि प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळजवळ निश्चित होईल. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एक खास भेट दिली.
रोहितने सिराजला दिली हिऱ्याची अंगठी गिफ्ट-
भारतीय संघाने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियन बनला. चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने एक खास हिऱ्यांची अंगठ्या दिली होती. सर्व खेळाडूंना हिऱ्याच्या खास अंगठ्या देण्यात आल्या, तेव्हा मोहम्मद सिराज उपस्थित नव्हते. आता त्याला मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामन्यापूर्वी अंगठी मिळाली. वानखेडे स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्माने सिराजला अंगठी दिली.
𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩 𝙩𝙤 𝘾𝙝𝙚𝙧𝙞𝙨𝙝 👏@mdsirajofficial receives a special ring from #TeamIndia Captain @ImRo45 for his impactful contributions in the team’s victorious ICC Men’s T20 World Cup 2024 campaign 💍@Dream11 pic.twitter.com/dHSnS4mwu1
— BCCI (@BCCI) May 5, 2025
सिराजने खेळले होते तीन सामने –
मोहम्मद सिराजने २०२४ च्या टी२० विश्वचषकात तीन सामने खेळले होते. अमेरिकेच्या टप्प्यात त्याला आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएई विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. या काळात त्याने दोन विकेट्स घेतल्या . पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सिराज ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने ७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १९ धावा दिल्या. भारताने तो सामना ६ धावांनी जिंकला.
हेही वाचा – SRH vs DC : विप्राजच्या ‘रनआऊट’वर काव्या मारन झाली भलतीच आक्रमक; VIDEO होतोय व्हायरल
रोहित आणि सिराजमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार –
आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज पुन्हा एकदा आमनेसामने येतील. अहमदाबादमध्ये जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा सिराजने बाजी मारली होती. दोन चौकार मारल्यानंतर त्याने रोहित शर्माला बाद केले. आता रोहितलाही सूर गवसला आहे. दुसरीकडे, सिराज देखील धोकादायक गोलंदाजी करत आहे. पॉवरप्लेमध्ये त्याच्याविरुद्ध धावा काढणे सोपे नाही. वानखेडे स्टेडियमवर दोघांमध्ये जोरदार काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.





