Rohit Sharma Future : बीसीसीआयच्या बैठकीनंतर हिटमॅनच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब! सचिव सैकिया म्हणाले, ‘रोहित शर्मा सध्या..”

Rohit Sharma Future : भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा निर्णय करणाऱ्या या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची अनपेक्षित अनुपस्थिती सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली.

Updated On:
Rohit Sharma Future : बीसीसीआयच्या बैठकीनंतर हिटमॅनच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब! सचिव सैकिया म्हणाले, ‘रोहित शर्मा सध्या..”

Rohit Sharma ODI Future Safe BCCI Review Meeting Ajit Agarkar Absent Devajit Saikia Statement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एकदिवसीय भवितव्यावरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत रोहितच्या वनडे कारकिर्दीला हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा निर्णय करणाऱ्या या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीला मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची अनपेक्षित अनुपस्थिती सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली.

“रोहित उत्तम खेळतोय, अफवांकडे लक्ष देऊ नका!”; बीसीसीआय सचिवांचा निर्वाळा

बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहितच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या. ते म्हणाले, “रोहित शर्मा सध्या अप्रतिम फलंदाजी करत असून इंटरनेटवर सुरू असलेल्या निराधार बातम्यांकडे कोणीही लक्ष देऊ नये.” सैकिया यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, रोहितचा फॉर्म कायम राहिल्यास तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा अविभाज्य भाग राहील.

अजित आगरकर बैठकीला गैरहजर; व्हर्च्युअलीही जोडले नाहीत –

या हायव्होल्टेज बैठकीला कसोटी व वनडे कर्णधार शुबमन गिल आणि टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर प्रत्यक्ष हजर होते. मात्र, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअलीही उपस्थित राहिले नाहीत. याविषयी विचारले असता सैकिया यांनी स्पष्ट केले की, ही बैठक अचानक बोलावण्यात आल्यामुळे वैयक्तिक कारणास्तव आगरकर येऊ शकले नाहीत. तरीही त्यांच्या अनुपस्थितीमुळे क्रिकेट वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हेही वाचा – MS Dhoni IPL : “…म्हणून खेळणार नाही!”; धोनीने थेट मित्रालाच सांगितला मोठा निर्णय; IPL 2027 पूर्वी बद्रीनाथचा खळबळजनक दावा

‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ची चर्चा फेटाळली; गिल-अय्यर मौन बाळगून रवाना –

बीसीसीआय लवकरच एका माजी खेळाडूची ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’ पदी नियुक्ती करणार असल्याच्या चर्चा होत्या; मात्र सचिव सैकिया यांनी अशा कोणत्याही नियुक्तीची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली. बैठकीनंतर बाहेर पडताना शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर मौन बाळगणे पसंत केले. रोहित शर्माच्या भवितव्यावर बीसीसीआयने सकारात्मक संकेत दिल्याने चाहत्यांमध्ये मोठा दिलासा पाहायला मिळत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Dhoni Hookah Video : "मी हुक्का ओढून येतो..."; पंतसमोर धोनीचे 'ते' शब्द! नव्या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर पेटवला वाद

2026-09-03 19:04:24

Dhoni Hookah Video : "मी हुक्का ओढून येतो..."; पंतसमोर धोनीचे 'ते' शब्द! नव्या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर पेटवला वाद

MS Dhoni IPL : "...म्हणून खेळणार नाही!"; धोनीने थेट मित्रालाच सांगितला मोठा निर्णय; IPL 2027 पूर्वी बद्रीनाथचा खळबळजनक दावा

2026-09-03 17:44:58

MS Dhoni IPL : "...म्हणून खेळणार नाही!"; धोनीने थेट मित्रालाच सांगितला मोठा निर्णय; IPL 2027 पूर्वी बद्रीनाथचा खळबळजनक दावा

Asian Games 2026 : क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या ७६८ जणांच्या जम्बो पथकाला मंजुरी

2026-09-03 17:10:20

Asian Games 2026 : क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या ७६८ जणांच्या जम्बो पथकाला मंजुरी

Mohsin Naqvi Statement : "भारतही आयर्लंडकडून हरला होता, मग...?"; पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर मोहसिन नक्वींचे अजब वक्तव्य

2026-09-03 16:36:54

Mohsin Naqvi Statement : "भारतही आयर्लंडकडून हरला होता, मग...?"; पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर मोहसिन नक्वींचे अजब वक्तव्य

Rohit Sharma Retirement : "लॉर्ड्सवर निवृत्ती घेणार का?"; निवड समितीच्या मेसेजने संतापला होता हिटमॅन; रागात घेतला होता मोठा निर्णय!

2026-09-03 15:49:54

Rohit Sharma Retirement : "लॉर्ड्सवर निवृत्ती घेणार का?"; निवड समितीच्या मेसेजने संतापला होता हिटमॅन; रागात घेतला होता मोठा निर्णय!
Rohit Sharma Future : बीसीसीआयच्या बैठकीनंतर हिटमॅनच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब! सचिव सैकिया म्हणाले, ‘रोहित शर्मा सध्या..” - Dainik Prabhat