Rohit Sharma Dance : MI vs KKR सामन्यात दोस्तीचा विजय! जखमी अंजिक्य हसवण्यासाठी रोहितने केला भन्नाट ‘डान्स’; पाहा VIDEO
Rohit Sharma Dance : केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे मैदाबाहेर जात असताना रोहित शर्माने केलेल्या कृतीने सर्वांची मने जिंकली.

Rohit Sharma funny dance for Ajinkya Rahane : आयपीएल २०२६ च्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात एकीकडे विजयासाठी चुरस पाहायला मिळाली, तर दुसरीकडे मैदानावर खेळाडूंमधील मैत्रीचे एक अतिशय भावनिक आणि मजेशीर दृश्यही चाहत्यांना अनुभवायला मिळाले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे मैदाबाहेर जात असताना रोहित शर्माने केलेल्या कृतीने सर्वांची मने जिंकली.
वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात एक अनपेक्षित घटना घडली. क्षेत्ररक्षण करत असताना केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे अचानक मैदानात कोसळला. त्याच्या पायाच्या स्नायूंमध्ये प्रचंड पेटके (Cramps) आल्याने त्याला उभं राहणंही कठीण झालं होतं. संघाचे फिजिओ धावत आले, पण वेदना असह्य असल्याने रहाणेने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तो बाहेर जात असताना मैदानावरील तणावपूर्ण वातावरण अचानक हलके झाले.
रोहितचा ‘डान्स’ आणि रहाणेचं हास्य – Rohit Sharma Dance
View this post on Instagram
अजिंक्य रहाणे वेदनेत असताना समोर स्ट्राईकवर असलेल्या रोहित शर्माने आपल्या मित्राचा मूड सुधारण्यासाठी मजेशीर डान्स करायला सुरुवात केली. रोहितची ही अचानक केलेली कृती पाहून रहाणेला हसू अनावर झाले आणि वेदनेत असूनही तो खळखळून हसला. एवढेच नाही तर केकेआरचे फिजिओदेखील हे पाहून हसू आवरू शकले नाहीत. मैदान सोडण्यापूर्वी रोहितने रहाणेला प्रेमाने मिठी मारली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Rohit Sharma Dance
अजिंक्य रहाणेची ६७ धावांची झुंजार खेळी – Rohit Sharma Dance
क्षेत्ररक्षण करताना रहाणेला दुखापत झाली असली, तरी फलंदाजी करताना त्याने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. रहाणेने ४० चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये ५ उत्तुंग षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. शार्दुल ठाकूरने त्याला बाद करून ही खेळी संपवली. रहाणेच्या अनुपस्थितीत रिंकू सिंगने संघाचे नेतृत्व सांभाळले. रहाणेची ही दुखापत केवळ स्नायूंचा ताण आहे की हॅमस्ट्रिंगची समस्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.





