Rohit Sharma : ‘ए बंद कर…’, संतापलेल्या रोहित शर्माचा चाहत्याला दम, VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma video viral ahead MI vs DC match : भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सातत्याने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला त्याचे नाव देण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर रोहित शर्मा आपल्या भावावर संतापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो चर्चत आला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. यावेळी हिटमॅन एका चाहत्याला रागाने व्हिडीओ बंद कर म्हणून सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आयपीएल २०२५ मधील आजचा सामना मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या निर्णायक सामन्यापूर्वी रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत एका पार्कमध्ये वेळ घालवताना दिसला. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रोहित आपली पत्नी रितिका, मुलगी समायरा, मुलगा आहान आणि कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत पार्कमध्ये वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी रोहित फोनवर बोलत असताना एक चाहता हा क्षण मोबाईलमध्ये टिपताना दिसला.
रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल –
The Sharma family Rohit, Ritika Ahaan and Sammy enjoying their free time in park Mumbai.😍❤️
Wait for funny reaction of bRO at the end.😂🔥❤️ pic.twitter.com/7FVrq4GbwA
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 21, 2025
रोहित शर्मा फोनवर बोलत असताना अचानक त्याचे लक्ष समोर गेले. त्यावेळी, रोहित जाणवले एक चाहता आपला व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत आहे. यानंतर रोहितने चाहत्याकडे रागाने बघत ‘कॅमेरा बंद कर…’ असा इशारा दिला. रोहितचा हा इशारा पाहून चाहत्याने तात्काळ व्हिडीओ रेकॉर्डींग थांबवले. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – IPL 2025 मध्ये खळबळ! बीसीसीआयच्या नव्या नियमावर केकेआरचा आक्षेप, काय आहे कारण?
आयपीएल २०२५ मधील रोहित शर्माची कामगिरी –
मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्माची बॅट हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये बॅट शांत होती. पण त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केल. सलग अर्धशतकं झळकावत रोहितने मुंबई इंडियन्सला स्पर्धेत पुन्हा आघाडीवर आणलं. या हंगामात रोहितने आतापर्यंत ११ सामने खेळले असून, त्याने ३०० धावा केल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.





