मुंबई – दहा ते बारा वर्षांपूर्वी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील पंचरत्नांनी सर्वांचेच निखळ मनोरंजन केले होते. त्यांच्या सुमधुर आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. “आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन’ हे पंचरत्न कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता याच पंचरत्नांपैकी एक ‘रोहित राऊत’ लवकरच अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठीवरील ’36 गुणी जोडी’ या मालिकेत त्याची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रोहित राऊतचा इंस्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग असून, रोहित नेहमीच आपल्या आवाजातून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. मात्र, आता तो अभिनय क्षेत्रातून देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे आले आहे. या मालिकेत ‘अमर्त्य’ असं रोहितच्या पात्राचे नाव असणार आहे.
View this post on Instagram
सध्या ’36 गुणी जोडी’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेषतः तरुणाईचं लक्ष वेधून घेणारी ठरत असून मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. आणि अश्यातच नव्या कलाकाराची एन्ट्री झाली असून, प्रेक्षक देखील खुश झाले आहेत. रोहित राऊत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तो चाहत्यांशी शेअर करत असतो.