“रोहितच्या खराब खेळण्याने इतर खेळाडूंवर दबाव”,सुनील गावस्कर यांचं वक्तव्य!

T20 WorldCup – टीम इंडियाला गुरुवारी १० नोव्हेंबरला इंग्लंड संघाविरुद्ध सेमीफायनल सामना खेळायचा आहे. भारतीय संघाकडून विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि गोलंदाजीत अर्शदीप सिंग चांगल्या लयीत आहेत. सुपर-१२ मध्ये ( T20 WorldCup ) भारतीय संघाने आतापर्यंत चांग ला खेळ दाखवला आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माची खराब कामगिरी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नेदरलँड्स संघाविरुद्धचे अर्धशतक वगळता, तो पाकिस्तान (४), दक्षिण आफ्रिका (१५), बांगलादेश (२) आणि झिम्बाब्वे (१५) अशा धावा करून बाद झाला आहे.
#T20WorldCup2022 | न्यूझीलंड-पाकिस्तान संघात उद्या लढत; विजयी संघ जाणार फायनलमध्ये
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी रोहित शर्माच्या खराब कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली आहे. गावस्कर म्हणाले की, रोहितच्या खराब फॉर्ममुळे इतर खेळाडू दबावाखाली येत आहेत. त्यामुळे आता महत्वाच्या सामन्यांमध्ये रोहितचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. सलामीच्या फलंदाजांना अद्यापही भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. त्यामुळे फलंदाजीचा सर्व भार विराट किंवा सूर्यकुमारच्या खांद्यावर येत आहे.
माध्यमांशी बोलताना सुनील गावसकर ( Sunil Gavaskar ) म्हणाले की, “पुढील दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा संघासाठी धावा करेल अशी आशा आहे. तो एक अनुभवी खेळाडू आहे. आता भारताला सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये कोणताही प्रयोग करण्याची संधी नसून त्यांना तेथे उत्तमच खेळ करावा लागेल. सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की रोहित शर्मा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी करेल.”
भारताने २००७ साली पहिलाच टी-२० विश्वचषक ( T20 WorldCup ) जिंकला होता. महत्वाचं म्हणजे त्या विजेत्या संघाचा रोहित शर्मा देखील भाग होता. त्यामुळे आता भारताला तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेत वर्चस्व मिळवण्याची संधी मिळाली आहे. मागील काही सामन्यांमध्ये रोहितची खराब कामगिरी पाहता कर्णधार म्हणून त्याच्यावर या सामन्यात जास्त जबाबदारी असणार आहे. अशात त्याचे खेळणे संघासाठी त्यांत महत्वाचे आहे.





