Rohit Pawar : “मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार”; रोहित पवारांचा फडणविसांवर निशाणा
Rohit Pawar : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Rohit Pawar : राज्यात सध्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विलनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर या चर्चांनी पुन्हा एकदा वेग धरला आहे.
याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही, असे स्पष्ट फडणवीसांनी सांगितले होते. इतकेच काय तर विलनीकरणाबाबत दोनच व्यक्त सांगू शकतात, असेही त्यांनी होते. यावर आता आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री फडणविसांवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार पोस्ट-
“विलीनीकरणाची चर्चा तर नाहीच आणि भाजपा सोबत असताना विलिनीकरणाचा तर विषय सुद्धा येत नाही. त्यामुळं “आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार नाही”, हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार आहे,” रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
पुढे त्यांनी लिहिले, “PCMC निवडणुकीत मुंढवा प्रकरणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करूनही अजितदादांनी भाजपला कणभर देखील भीक घातली नव्हती. दादांना ब्लॅकमेल कोण करत होतं किंवा ब्लॅकमेल करण्याचे आदेश कुणाचे होते? त्यामुळे ब्लॅकमेलिंगच्या पायावर ज्यांचं राजकारण उभं आहे, अशा भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या एकत्र करण्याच्या विषयात न बोललेलंच बरं..!”
नेमकं म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
फडणवीस म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात एक शरद पवार आणि दुसऱ्या सुनेत्रा पवार. विलिनीकरण करण्याचे जर ठरवले तर ते आम्हाला सांगतीलच, मात्र अजून तरी आम्हाला याबद्दल काहीही कळवले नाही.”
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कामाच्या पद्धतीत फरक आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी जी भूमिका मांडली होती. तीच त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. विलिनीकरणाविषयी सुनेत्रा पवार सांगू शकतात. पण आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
Thackeray Family Bhau Beej : ठाकरे कुटुंबाकडून भाऊबीज एकत्र साजरा; खास क्षणांचे फोटो समोर…





