रोहित पवारांकडून आता महिला राज्यमंत्र्याचा व्हिडिओ शेअर; भर कार्यक्रमात केली ग्रामसेवकाला दमदाटी

Maharashtra Politics | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जाऊ लागला. विरोधकांकडून देखील त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता.
अखेर कोकाटे यांच्याकडून कृषी खात काढून टाकण्यात आले. तर अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे युवक आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. यानंतर आता रोहित पवार यांनी राज्यमंत्री मेघना बर्डीकर यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ शेअर केला आहे. Maharashtra Politics |
मेघना बोर्डीकर यांची अधिकाऱ्याला भर कार्यक्रमात दमदाटी
रोहित पवार यांनी राज्यमंत्री मेघना बर्डीकर यांचा एक व्हिडीओ ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. “असं कुणाचं काम केलं ना तर याद राख, कानाखाली मारीन. पगार कोण देते? आत्ताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी”, अशा शब्दात मेघना बोर्डीकर या ग्रामसेवकाला भर कार्यक्रमात दमदाटी करत असल्याचे दिसत आहे.
सभागृहात रम्मी खेळणारे…
पैशांच्या बॅगा भरणारे…
डान्सबार चालवणारे…
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट… pic.twitter.com/rRMbQsPHde
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 2, 2025
हा व्हिडीओ पोस्ट करताना रोहित पवार यांनी, ‘सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची… सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?, ‘असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. Maharashtra Politics |
पुढे रोहित पवार म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..!’ असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. Maharashtra Politics |
हेही वाचा :





