जामखेड : कर्जत-जामखेड मतदार संघाचा गेल्या पाच वर्षात कायापालट करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासाची गंगा आणली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार हे १ लाख मताच्या पुढे निवडून येतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष अमर चाऊस यांनी केला आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक नेते विकासाला साथ देण्याऐवजी रोहित पवार यांची साथ सोडून जात आहे. मात्र ही त्याची सर्वात मोठी चूक असून पवारांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघाचा कायापालट केला आहे. जामखेड शहरात पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस वसाहत, एसटी बस स्थानक,कुसडगाव येथील राज्य राखीव दल,नवीन नगरपरिषद कार्यलय, नाना नानी पार्क, सभागृह, नवीन वाचनालय, विचारणा नदी विकास कामे, आणि सर्वात महत्वाची जामखेड शहराची उजनी पाणी योजना, खर्डा किल्ला विकास कामे ,दहा हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप, आरोग्य शिबीर, शेती विषयक उपक्रम, नोकरी मेळावे, महिलांसाठी कर्ज वाटप आदींसह विविध कामे रोहित पवार यांनी जातीने लक्ष देऊन केले आहे. नेते जरी सोडून गेले असतील तरी जनतेची नाळ आमदार रोहित पवार यांच्या सोबत जोडलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हेच आमदार होऊन १ लाख मताच्या पुढे निवडून येतील असे अमर चाऊस यांनी सांगितले.