Rohit Pawar : राष्ट्रवादीचे (शप) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बुधवारी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेत, राज्याच्या जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांना लक्ष्य करून बदनामीकारक विधाने करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार सरकारला देणाऱ्या कायद्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंतीही त्यांनी (Rohit Pawar) राज्यपालांकडे केली. रोहित पवार (Rohit Pawar)म्हणाले, जादूटोणा आणि अंधश्रद्धांविरोधी कायद्यासाठी पाठपुरावा करण्यात दिवंगत विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा कायदा लागू झाला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती मी राज्यपालांकडे केली आहे. Rohit Pawar छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांना लक्ष्य करून बदनामीकारक विधाने करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप पवार यांनी केला. अलीकडेच, बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक विधाने केली होती. त्याचप्रमाणे, इतरही अनेक व्यक्तींनी अवमानकारक विधाने केली आहेत. अशा विधानांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार सरकारला देणाऱ्या कायद्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती मी राज्यपालांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांनी पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून कथितरित्या अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याबद्दलही चिंता व्यक्त केली. तसेच, तत्कालीन नांदेड विद्यापीठाचे पहिले कुलगुरू दिवंगत जनार्दन वाघमारे यांच्या नावाने विद्यापीठात अध्ययन केंद्र स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली. विद्यापीठाच्या आवारात त्यांचा पुतळा उभारण्याच्या त्यांच्या कुटुंबीयांच्या मागणीलाही त्यांनी पाठिंबा दर्शवला. राज्यपालांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्याबाबत योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी (Rohit Pawar) दिले असल्याचे पवार यांनी सांगितले. हे पण वाचा : Sharad Kalaskar Bail : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील दोषी शरद कळसकरला जामीन मंजूर