रोहित पवारांची अजित पवारांवर टीका ; म्हणाले,‘अतिशहाणा त्यांचा मंडप…’

Rohit Pawar on Ajit Pawar। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राज्यात एकाच पक्षाचे दोन गट पाहायला मिळत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका सभेचा व्हिडीओ शेअर करत टीका केलीय. या व्हिडिओत सभेतील मंचावर अजित पवार बोलत आहेत. मात्र सभेला फारशी गर्दी झालेली दिसत नाही. सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात अनेक ठिकाणी रिकाम्या खुर्च्या दिसतायत. तर काही जण सभा सोडून निघून जात असल्याचे पाहायला मिळतंय.
या भाषणापेक्षा डोंबाऱ्याच्या खेळाला जास्त गर्दी असते..!#MaharashtraGovernment #MoyeMoye pic.twitter.com/YforDmAqmp
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 12, 2024
‘अतिशहाणा त्यांचा मंडप रिकामा’ Rohit Pawar on Ajit Pawar।
रोहित पवार यांनी या व्हिडीओला ‘अतिशहाणा त्यांचा मंडप रिकामा’ असं कॅप्शन दिलंय. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पुढे “या भाषणापेक्षा डोंबाऱ्याच्या खेळाला जास्त गर्दी असते!” असे म्हटले. व्हिडीओसह #MoyeMoye हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर व्हिडीओमध्येदेखील हे गाणं बॅकग्राऊंडला वाजतंय. हा व्हिडीओ शेअर करून रोहित पवारांनी अजित पवारांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी सर्व खटाटोप Rohit Pawar on Ajit Pawar।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या भाषणादरम्यान शरद पवार यांना उद्देशून केलेलय वक्तव्यावरून आमदार रोहित पवाराणी त्यांच्यावर पलटवार केलाय. “आम्हाला माहीत असलेले अजित पवार आणि आताचे अजित पवार हे फार वेगळे आहेत. केवळ भाजपच्या श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांच्याकडून सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती त्यांच्या पक्षाकडून उमेदवार म्हणून येऊ शकतो “ असे रोहित पवारांनी म्हटले.





