Rohit Pawar Press Conference : गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल AAIB कडून प्रसिद्ध करण्यात आला. हा अहवाल २२ पानांचा असून, यामध्ये अजित पवार यांचे विमान झाडाला धडकले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासह विमान धावपट्टीवर लँडिग करताना असणाऱ्या त्रुटी, पायलटला शेवटचा संदेश याही गोष्टींविषयी सविस्तर सांगण्यात आले आहे. या अहवालानंतर विमान अपघातावर विविध प्रश्न उपस्थित करणारे आमदार रोहित पवार यांनी अहवालावर प्रत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत AAIB च्या प्राथमिक अहलावर नाराजी व्यक्त केले असून, पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान सुरुवातीला झाडाला धडकले; रोहित पवार म्हणाले (Rohit Pawar Press Conference) “रिपोर्टमध्ये झाडं आहेत असं सांगितलंय, इथं कुठं झाडं आहेत, इथे झुडूप आहे, त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबादारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न एआयबीकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागेल,” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. यावेळी रोहित पवारांनी विमान पडतानाच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट दाखवला. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, “व्हिडिओ पाहिल्यावर विमान राईट बँक झालं नव्हतं. तर लेफ्टला पडलं होतं. हे दिसून येत आहे, पण रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. या रिपोर्टमध्ये बेसीक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं, तर डोक्याला लागली की पोटात लागली, जर डोक्यात लागली असेल तर इथे (अहवालात) सांगण्यात आलंय की छातीत लागली, इथे बेसिक निरीक्षण एआयबी या संस्थेचं चुकलंय,” असे स्पष्ट मत रोहित पवारांनी व्यक्त केले. रोहित पवारांना मोठी शंका (Rohit Pawar Press Conference) या अपघाताचा तपास करणाऱ्या एआयबी आणि डीजीसीएच्या अहवालात अनेक चुका आणि विसंगती आहेत. व्हीएसआर आणि एअरो या कंपन्यांना कोणीतरी वाचवत असल्याचा मोठा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. ज्यामुळे तपासावर परिणाम होत असल्याचे रोहित पवार म्हणाले. “मी व्हीएसआर किंवा डीजीसीए यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर, डीजीसीए आणि एरो या कंपन्यांना मी टार्गेट करत नाही, मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे. आमची अपेक्षा होती की या अहवालात चुका होऊ नये. पण त्या झाल्या. यांनी बारामतीला जिल्हा करून टाकला. एएआयबी किती गंभीर आहे यावरून ते दिसून येते, ” असे म्हणत रोहित पवारांनी अहवालावर तीव्र स्वरुपात नाराजी व्यक्त केली आहे. हेही वाचा : Janhvi Kapoor: “…मी माझ्या भावासोबत घडताना पाहिलं”; अर्जुन कपूरच्या ट्रोलिंगवर जान्हवीची प्रतिक्रिया