Rohit Pawar : जास्त काळ भाजपसोबत राहू नका; रोहित पवार यांची एकनाथ शिंदेंना विनंती
आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही अप्रत्यक्ष विनंती केली आहे की, त्यांनी जास्त काळ भाजपसोबत राहू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

Rohit Pawar : आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही अप्रत्यक्ष विनंती केली आहे की, त्यांनी जास्त काळ भाजपसोबत राहू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे, तरी हिंदू खतरे में, तरी संविधान खतरे मे है. सरकार तुमचे तरी, म्हणतात संविधान बचाव आंदोलन आहे.
सरकारचे डोके सटकले आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी असे म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. आमच्या कुटुंबातील दुसऱ्या पक्षाचे काय चालले आहे हे त्यांचे त्यानांच माहिती नाही, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला. जे कोणी भाजपसोबत सत्तेत राहिले, त्यांचे नुकसान होणार असल्याचे मत त्यांनी (Rohit Pawar) व्यक्त केले.
भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा एआय डेटा सेंटर माहिती नाही. एक जण म्हणाला की, 100 पवार आले तर एआय डेटा सेंटर होणार. 100 कशाला एकटाच पवार तुम्हाला बास आहे, असे पवार म्हणाले. तसेच, राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना नसून, ती कर्ज वसुली योजना असल्याची टीका रोहित पवारांनी सरकारवर केली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी संकटमोचक असणारे गिरीश महाजन आले आणि त्यांनी आश्वासन दिले, पण दोन-तीन महिने झाले. आश्वासनाची पूर्तता केली नाही. यंदाच्या वर्षी दोन लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. हिवाळी अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे असा इशारा रोहित पवारांना (Rohit Pawar) दिला.






