Rohit Pawar : कुंभमेळ्यात विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार; रोहित पवार यांची टीका
नाशिकमध्ये आजपासून ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला सुरुवात झाली आहे. मात्र याआधी सिंहस्थ कुंभमेळ्यात विकासकामांच्या निमित्ताने मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा केला आहे.

Rohit Pawar : नाशिकमध्ये आजपासून ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला सुरुवात झाली आहे. मात्र याआधी सिंहस्थ कुंभमेळ्यात विकासकामांच्या निमित्ताने मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा केला आहे.
कुंभमेळ्याच्या खर्चात 35 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत रोहित पवार यांनी वृत्तपत्रामध्ये नोटीस प्रसिद्ध करून महायुती सरकारविरोधात थेट कायदेशीर लढाईचे रणशिंग फुंकले आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, अन्नदाता शेतकरी भीषण दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना, हे सरकार त्याच्या हातावर 5 हजार रुपये टिकल्या टेकवून त्याची थट्टा करणार आणि दुसऱ्या बाजूला नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या 35 हजार कोटी रुपये खर्चाचा कोणताही हिशोब द्यायला तयार नाही.
कुंभमेळ्याच्या निधीतून होणाऱ्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत. यातील काही माहिती आमच्याकडं असून सरकारकडूनही ही माहिती मिळतेय का? हे पाहण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही विविध शासकीय विभागांकडे पत्रव्यवहार केला, माहिती अधिकारात अधिकृत अर्ज दिले. परंतु, जाणीवपूर्वक ही माहिती दडवली जात आहे, असा आरोप त्यांनी (Rohit Pawar) केला.






